Aashadhi Ekadashi Special: महाराष्ट्रामध्ये वारीची मोठी परंपरा आहे. आपल्याकडे दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरला जाऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेत असतात. काही तासांमध्ये आषाढी पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होणार आहे. एका प्रकारे वारीची सुरुवात होणार आहे. कामाच्या व्यापामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे बऱ्याचजणांना वारीमध्ये सहभाग घेणे शक्य होत नाही. अशा वेळी वारीला न जाता आल्याने तुम्ही उपवास करुन किंवा घरच्या घरी गोडाचा पदार्थ बनवून तो देवासमोर ठेवून वारीचा आनंद साजरा करु शकता. आपल्याकडे खास सणाला शिरा बनवला जातो. वारीच्या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने तुम्ही घरी उपवासाचा शिरा बनवू शकता.
साहित्य :
- वरी तांदूळ – १ वाटी
- ओलं खोबरं – १/४ वाटी
- साखर – ३/४ वाटी
- साजूक तूप – १/२ वाटी
- केळं – १ गोल कापून
- वेलची पावडर – १/२ चमचा
- केशर – ६-७ काड्या
- दूध – १ वाटी,
- वेलची – २
- बदामाचे तुकडे – आवडीप्रमाणे
कृती :
- प्रथम केळ्याचे काप साजूक तुपात परतून घेऊन बाजूला ठेवा.
- पातेल्यात तूप गरम करून त्यात वेलची फोडून घाला.
- त्यावर वरी तांदूळ, बदामाचे तुकडे आणि खोबरे घालून चांगले परतून घ्या.
- त्यावर वाटीभर गरम दूध व १ वाटी गरम पाणी घालून वरी तांदूळ नीट शिजवून घ्या.
- त्यावर साखर, वेलची पावडर आणि केशर घाला.
- नीट मिक्स करून वरून तूप घाला व चांगली वाफ आणा.
- शेवटी तुपात परतलेलं केळं घालून मिक्स करा.
आणखी वाचा – रताळ्याचा कीस! आषाढी एकादशी व्रत करणार्यांसाठी खास उपवास स्पेशल रेसिपी!