Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीच्या दिवशी उपवासाला स्पेशल काय फराळ करावा, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास रेसिपी सांगणार आहोत. नेहमी उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळला असाल तर या वेळी तुम्ही टेस्टी उपवासाची भेळ करू शकता. ही भेळ खायला जितकी टेस्टी आहे तितकीच हेल्दी सुद्धा आहे. जाणून घ्या उपवासाची भेळ कशी बनवायची?
साहित्य
- साबुदाणाची खिचडी
- बारीक चिरेलेली काकडी
- खारे शेंगदाणे
- तळलेला बटाट्याचा किस
- दही
- साखर
- तळलेला नायलॉनचा साबुदाणा
हेही वाचा : पावसाचा आनंद करा द्विगुणीत अन् घरीच बनवा कुरकुरीत कोबी भजी, जाणून घ्या सोपी रेसिपी
कृती
- साबुदाण्याची खिचडी बनवावी.
- त्यात तळलेला साबुदाणा, खारे शेंगदाणे, तळलेला बटाटा किस, चवीनुसार साखर आणि दही टाकावे.
- या मिश्रणाच बारीक चिरलेली काकडी टाकावी
- सर्व एकत्र मिक्स करावे.
- उपवासाची भेळ तयार झाली.