नीलेश लिमये
साहित्य :
अर्धा किलो चिकन, २ कांदे, पाव वाटी खोबरं, पाव वाटी टोमॅटो प्युरी, १ वाटी आमरस, ३ चमचे आले-लसूण पेस्ट, १ चमचा तिखट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा धने-जिरे पूड, १ चमचा हळद, २ मोठे चमचे दही, २ मोठे चमचे क्रीम, १ ते २ तमालपत्र, मीठ चवीनुसार.
कृती
प्रथम चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. त्याला हळद, मीठ, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, धने-जिरे पूड आणि दही लावून घ्यावे आणि १५ ते २० मिनिटे ते मुरण्यासाठी ठेवावे.
कांदा आणि खोबरे भाजून आणि वाटून घ्यावे. यानंतर एका कढईत तेल घालून त्यात तमालपत्र, टोमॅटो प्युरी घालून २-३ मिनिटे चांगले परतून घ्यावे. त्यातच कांदा आणि खोबऱ्याचे वाटण घालून परतावे. आता यामध्ये मुरलेले चिकनचे तुकडे छान परतून घ्यावे. थोडेसे पाणी घालून हे चिकन शिजवून घ्यावे. चिकन शिजल्यानंतर त्यात आमरस घालावा आणि एक उकळी आणावी. आता गॅस बंद करून त्यात क्रीम घालावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवावे आणि पाव किंवा भाताबरोबर फस्त करावे. ही आगळीवेगळी ऑस्ट्रेलियन डिश आहे. आंब्याच्या या मोसमात नक्की करून पाहा.