Avocado Toast Recipe in Marathi: नाश्त्यासाठी अनेकदा हेल्दी खाण्याच्या नावावर ब्रेड बटर असेच पदार्थ खाल्ले जातात. तसंच अनेकदा पोहो, उपमा हेदेखील रोजचे पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा येत असेल. म्हणूनच आज आपण नाश्त्यासाठी एक हेल्दी ऑप्शन पाहणार आहोत. तर या रेसिपीचं नाव आहे, ॲव्होकॅडो टोस्ट रेसिपी.

अवाकाडो टोस्टचं साहित्य

  • १ ॲव्होकॅडो
  • २ हिरव्या मिरच्या
  • २ टेबलस्पून कोथिंबीर
  • १ लिंबू
  • १ टीस्पून चिली फ्लेक्स
  • १ टेबलस्पून फेटा चीज
  • ६ मल्टी ग्रेन ब्रेड स्लाइस
  • मीठ स्वादनुसार
  • २ टेबलस्पून बटर

अवाकाडो टोस्टची कृती

सर्वप्रथम एका बाऊल मध्ये ॲव्होकॅडोचा गर काढा. हा गर चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्या. मिरची व कोथिंबीर एकत्र मिक्सर मधून काढून घ्या.

आता मल्टी ग्रेन ब्रेड बटर घालून तव्यावर टोस्ट करून घ्या.

आता मॅश केलेल्या आवाकाडो मध्ये कोथींबीर मिरची पेस्ट टाका.आया यात मीठ व लिंबू पिळा. सर्व एकत्र करा.

आता टोस्ट केलेली ब्रेड स्लाइस घ्या त्यावर अवा कडो ची पेस्ट लावा.आता यावर चीज घाला. वरून चिली फ्लेक्स घाला आणि सर्व्ह करा.