Badam Sheera Recipe : कोणताही सण असो किंवा शुभकार्य गोड पदार्थाशिवाय अपूर्ण आहे. गोड पदार्थ खाऊन आणि इतरांना खाऊ घालून सण साजरा करण्याची पद्धत आहे. सध्या देशभरात ख्रिसमस आणि नवीन वर्षाची जय्यत तयारी सुरू आहे. सगळीकडे गोड पदार्थ बनवले जात आहे. यंदा तुम्ही कोणता गोड पदार्थ बनवत आहात. जर तुम्हाला सुद्धा नवीन वर्षानिमित्त किंवा ख्रिसमस निमित्त गोड पदार्थ बनवायचा असेल तर तुमच्याकडे एक चांगला पर्याय आहे. तुम्ही बदामचा शिरा बनवू शकता. तुम्ही आता पर्यंत रव्याचा, गाजराचा, अशा अनेक पदार्थांचा शिरा बनवून खाल्ला असेल पण तुम्ही कधी बदामचा शिरा खाल्ला आहे का?
बदामच शिरा चवीला अप्रतिम लागतो आणि तितकाच पौष्टिक आहे. जर हा शिरा एकदा खाल्ला की तुम्हाला हा शिरा पुन्हा पुन्हा खावासा वाटू शकतो. रवा, बदाम आणि तूपापासून बनवता येणारा हा स्वादिष्ट शिरा कसा बनवतात, तुम्हाला माहिती आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.
साहित्य :
- जाडसर रवा
- तूप
- साखर
- बदाम
- वेलची पूड
- केशरच्या काड्या
- काजू
हेही वाचा : हिवाळ्यात काजू, बदामपासून बनवा ‘मसाला गूळ’; ट्राय करा ‘ही’ १० मिनिटांत तयार होणारी हटके रेसिपी…
कृती:
- सुरुवाीला एक कढई घ्या आणि त्यात तूप टाका
- गरम तूपात रवा चांगला भाजून घ्या.
- सुरुवातीला बदामचे साल काढून घ्या आणि हे बदाम मिक्सरमध्ये बारीक करुन जाडसर पूड तयार करा.
- कढईत पुन्हा तूप गरम करुन ही बदामची पूड सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
- त्यात भाजलेला रवा चांगला नीट ढवळून घ्या.
- त्यानंतर त्यात साखर आणि दूध घालून हे मिश्रण नीट एकजीव करा.
- त्यानंतर त्यावर झाकण ठेवा आणि शिरा चांगला शिजवून द्या.
- त्यानंतर केशर घालून थोडा वेळ आणखी शिरा शिजवा.
- शेवटी त्यावर वेलची पूड आणि बारीक केलेले काजू बदाम टाका.
- गरमा गरम बदाम शिरा तयार होणार.
- शिरा सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर गरमागरम तूप टाकून द्यावे.