शुभा प्रभू साटम
आणखी वाचा
साहित्य :
धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर आलं, मिरची,बाजरी पीठ वा बेसन, ओवा, हिंग, हळद, मीठ.
कृती
तळण्यासाठी तेल तापत ठेवावे. कारण हे पीठ भिजवून ठेवलं तर सैल होतं. निवडून धुऊन चिरलेली मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं, मिरची, बाजरी पीठ, ओवा, हिंग, हळद, मीठ आणि याउपर कोणताही मसाला वैयक्तिक आवडीने टाकावा. हे सर्व एकत्र करून घट्टसर पीठ भिजवून पुऱ्या काढाव्यात. बाजरीसोबत जोड म्हणून तांदूळ पिठी, कणिक वा बेसन इतकंच काय, पण थालीपीठ भाजणी पण घालता येते. त्यामुळे पुऱ्या मऊ राहतात.