Bajra Soup : बाजरी ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक असतात. तज्ज्ञांकडून हिवाळ्यात बाजरी खाण्याचा सल्ला दिला जातो कारण बाजरीमध्ये पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम असतात जे शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असतात. सहसा आपण बाजरीची भाकरी खातो पण तुम्ही कधी बाजरीचे सूप प्यायले आहे का? आज आम्ही तुम्हाला बाजरीचे सूप कसे बनवायचे, हे सांगणार आहोत.
साहित्य
बाजरी
तेल
जिरे
हिंग
हिरवी मिरची
लसूण
आलं
कढीपत्ता
पाणी
हळद
मीठ
कोथिंबीर
हेही वाचा : Methi Pakoda : हिवाळ्यात असे बनवा गरमा गरम कुरकुरीत मेथी पकोडे; रेसिपी लगेच नोट करा
कृती
सुरुवातीला एका कढईत तेल गरम करा.
तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे आणि हिंग टाका
यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेलं लसूण, आलं, कढीपत्ता टाका.
लसूण आणि आलं चांगल्याने परतून घेतल्यानंतर यात बाजरीचं पीठ घाला.
त्यानंतर त्यात बाजरीचं पीठ चांगले भाजून घ्या.
बाजरी भाजल्यानंतर त्यात कोमट पाणी घाला आणि सर्व एकत्र करा.
त्यानंतर त्यात चवीनुसार आणि हळद घाला.
थोडी उकळी येऊ द्या.
शेवटी यावर कोथिंबीर घाला आणि गरमा गरम बाजरीचे सूप सर्व्ह करा.