दिवस चांगला जात असेल किंवा वाईट, कुणी आपल्यासमोर एखादा गोड पदार्थ ठेवला; खासकरून चॉकलेट केक समोर आला, तर आपोआप आपला चेहरा खुलतो. कोणत्याही खास कारणासाठी मग तो वाढदिवस असो किंवा अजून काही केक आणायचा म्हटलं, तर आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिला येतो तो म्हणजे गडद चॉकलेटी रंगाचा चॉकलेट केक. पण आपण हा केक दर वेळेस बाहेरूनच आणत असतो किंवा बाहेरच्या कॅफे वा बेकरीमध्ये जाऊन त्याचा आस्वाद घेत असतो. कारण- बऱ्याच जणांना चॉकलेट केक घरी बनवणं म्हणजे फार कष्टाचं आणि अवघड काम आहे, असं वाटतं.

पण, कोणताही पदार्थ बनवण्यासाठी योग्य टिप्स वापरल्या, तर तो तयार करणं अवघड नसतं. तसंच काहीसं या केकचंही आहे. केक बाहेरून असतो तसा मऊ, हलका व चविष्ट बनावा यासाठी तो कशा प्रकारे बेक करायला हवा हे माहीत असायला हवं. तुम्ही चॉकलेट केक घरी ओव्हन, मायक्रोवेव्ह किंवा अगदी प्रेशर कुकरमध्येही तो सहज बनवू शकता.

Winter Special Kabab Recipe In Marathi
हिवाळा स्पेशल कबाब; चव अशी की एकदा खाल तर खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Oreo pancake recipe easy cake recipe at home
Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
How To Make Dahi Kabab In Marathi
Dahi Kabab Recipe : फक्त १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा ‘दही कबाब’; कुरकुरीत, रेस्टोरंटसारखे कबाब पाहून तोंडाला सुटेल पाणी
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी

चॉकलेट केक बनवण्याच्या तीन सोप्या पद्धती :

१. ओव्हनमधील चॉकलेट केक

बाहेर बेकरी किंवा कॅफेमध्ये मिळणारे सगळे केक हे ओव्हनमध्ये बनवलेले असतात. या केकला एक सुंदर मऊपणा असून, तो खूप हलका असतो. आता हा केक ओव्हनमध्ये तयार होत असल्याने अर्थातच त्याला तयार होण्यासाठी थोडा वेळ लागतो. घरी ओव्हन असल्यास, त्याच्या मधल्या कप्यात केक बेक करण्यासाठी ठेवावा. जर तुम्ही केक सर्वांत वरच्या किंवा सर्वांत खालच्या कप्प्यामध्ये बेक करण्यासाठी ठेवत असाल, तर तो पूर्णपणे शिजणार नाही. त्यामुळे तुम्हाला हवा असणारा हलका, मुलायम केक बनण्यास अडथळा येऊ शकतो.

हेही वाचा : फक्त १० रुपयांमध्ये बनवा चटपटीत स्टार्टर; कुठल्याही पार्टीत ठरतील हिट! पाहा रेसिपी….

२. मायक्रोवेव्हमध्ये तयार होणार केक

प्रत्येकाच्या घरी ओव्हन असतोच, असं नाही. परंतु, तुमच्या घरी जर मायक्रोवेव्ह असेल, तर त्याचा वापर करूनदेखील अतिशय सुंदर केक बनवता येतो. मायक्रोवेव्हमध्ये तुम्हाला साधारण आठ ते दहा मिनिटांमध्ये केक तयार करता येतो. त्यासाठी केकचं मिश्रण मायक्रोवेव्हच्या भांड्यात काढून घेऊन, मायक्रोवेव्हचा टायमर लावून ठेवा. त्यामुळे तुम्हाला सतत त्याकडे लक्ष द्यावं लागणार नाही.

३. प्रेशर कुकरमध्ये तयार होणार केक

कोणत्याही प्रकारचा केक तयार करण्यासाठी मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन घरात असण्याची आवश्यकता नसते. आपल्या रोजच्या वापरातल्या प्रेशर कुकरमध्येही चॉकलेट किंवा कोणत्याही प्रकारचा केक अतिशय सोप्या पद्धतीनं तयार होतो. त्यासाठी केकचं तयार मिश्रण एका भांड्यात ओतून घ्या. आता कुकरमध्ये कुकरचं छोटं स्टॅण्ड ठेवून, त्यावर केकच्या मिश्रणाचा डबा ठेवा. कुकरचं झाकण लावून घेताना, त्याची शिटी काढून तो लावावा. या पद्धतीमध्ये केक तयार होण्यास साधारण ३० ते ४० मिनिटे लागू शकतात.

आता तुम्ही घरी अगदी सहजतेनं आणि कोणत्याही प्रकारचा केक बेक करू शकता.