Banana Coffee Cake : बनाना कॉफी केक म्हणजेच केळ आणि कॉफी वापरून तयार केलेला केक ही एक अत्यंत चविष्ट आणि टी टाईम स्नॅक्ससाठीची रेसिपी आहे, जी तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी सहज तयार करू शकता. पिकलेले केळ आणि थोडी कॉफी वापरुन हा केक सहज तयार केला जाऊ शकतो, ज्याची चव अप्रतिम आहे. हे गेट-टुगेदर आणि पार्ट्यांकरिता केकसाठी ही सर्वात वेगळी रेसिपी आहे. चला जाणून घेऊ या..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केळ आणि कॉफीचा केक कसा तयार करावा?

केळ आणि कॉफीचा केक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

मैदा, बेकिंग पावडर, पिठी साखर, अंड, व्हॅनिला इसेन्स, लोणी-बटर, दूध आणि आक्रोड, बदाम, कॉफी आणि स्मॅश केलेले केळ

हेही वाचा – बटाट्याचे फ्रेंच फ्राईज खाऊन कंटाळात? मग आता घरीच तयार करा रव्याचे फ्राईज, पाहा सोपी रेसिपी

केळ आणि कॉफीचा केक तयार करणाची कृती

कोणत्याही भांड्यात मैदा घेऊन तो बेकिंग पावडरसह चाळून घ्या आणि त्यामध्ये पिठी साखर टाकून व्यवस्थित मिक्स करा. एक अंड फोडून त्यात टाका आणि व्हॅनिला इसेन्स, लोणी-बटर, दूध आणि आक्रोड, बदाम, कॉफी आणि स्मॅश केलेले केळ टाका. व्यवस्थित फेटून घ्या जेणेकरून कोणतही गाठ त्यात राहणार नाही. आता एका बटर लावल्याला पॅनमध्ये टाकून parchment paper ने झाकून टाका. कागदाला थोडे पीठ लावले झाडून टाकले आहे ना याची खात्री करा.

हेही वाचा – चटपटीत मसाला कॉर्न चाट, फक्त ५ मिनिटांत होईल तयार! लिहून घ्या सर्वांच्या आवडत्या पदार्थाची रेसिपी

पॅनला १८० डिग्री सेल्सियसला किंवा ३६० डीग्री फारेनहाईटवर आधीच गरम केलेल्या ओव्हनमध्ये ठेवा. साधारण २५ ते ३५ मिनिटांपर्यंत केक बेक करा. बाहेर काढून थंड करा. कापून तुकडे करा आणि चहा किंवा कॉफीसोबत सर्व्ह करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banana coffee cake recipe delicious teatime snack that you can prepare at home snk
Show comments