Banana Snacks at Home: केळी हे वर्षभर मिळणारे फळ आहे. अनेकांना हे फळ आवडत. केळी अशीच खाल्ली जाते पण याशिवाय त्याच्यापासून वेगवगेळ्या रेसिपीही बनवल्या जातात. तुम्ही अनेकदा केळीचा शेक प्यायला असेल. तुम्ही कच्च्या केळ्याची भाजीही खाल्ली असेल. पण या रेगुलर रेसिपी सोडून आज आम्ही तुम्हाला एका अतिशय टेस्टी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही केळीचे मफिनची बनवू शकता. ही रेसिपी बनवायला तुमचा जास्त वेळ लागणार नाही. केळी मफिन हा अतिशय टेस्टी स्नॅक्स ऑप्शन आहे. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही ही रेसिपी आवडेल. चला जाणून घेऊया हे मफिन्स कसे बनवायचे.

बनाना मफिन्स साहित्य

पिकलेली केळी-३ मध्यम आकाराची
१ कप कणिक / मैदा
१/२ कप साखर
१/४ कप तूप
३/४ चमचा बेकिंग पावडर
१/2 चमचा बेकिंग सोडा
१/४ चमचा दालचिनी पूड
चिमूटभर मीठ
१ टीस्पून दूध (गरज पडल्यास)
काजू, बेदाणे आवडीनुसार

बनाना मफिन्स कृती

१. सर्वप्रथम एका बाउलमध्ये केळी सोलून मॅश करून घ्या. त्यात साखर आणि तूप घालून चांगलं एकत्र करून घ्या.

२. दुसऱ्या बाउलमध्ये कणिक, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ आणि दालचिनी पूड एकत्र करून घ्या. कणकेच्या बाउलमध्ये केळ्याचे मिश्रण घाला आणि एकत्र करा. जास्त फेटू नका.

३. मिश्रण फार घट्ट असेल तर थोडे दूध घालून मिक्स करा.ओव्हन १८० डिग्री वर गरम करून घ्या.

४. मफिन साच्याला तूप लावून त्यात मोठ्या चमच्याने मिश्रण घाला. अर्धा साचा भरेल एवढं मिश्रण घाला. वरून काजू, बेदाणे घाला.

हेही वाचा >> ढाबा स्टाईल झणझणीत मिरची फ्राय; तोंडी लावण्यासाठी मिरचीची भन्नाट रेसीपी नक्की ट्राय करा

५. ओव्हनमध्ये १८० डिग्री वर ३०-३५ मिनिटं बेक करा.बनाना मफिन्स

६. गरमागरम बनाना मफिन्स चहा बरोबर सर्व्ह करा.