Banana Salad Recipe : केळी हे असे फळ आहे जे बाराही महिने मार्केटमध्ये उपलब्ध असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना केळी खायला आवडतात पण नेहमी नेहमी केळी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही केळीचे सॅलड बनवू शकता. केळीचे सॅलड अत्यंत स्वादिष्ट आणि बनवायला खूप सोपी आहे. आज आपण ही सोपी रेसिपी जाणून घेऊ या.
साहित्य:
- केळी
- गाजर
- नारळ
- बारीक चिरलेली कांद्याची पात
- हिरवी मिरच्या़
- लिंबू
- साखर
- मीठ
हेही वाचा : कुरकुरीत मंच्युरियन घरी कसे बनवावे? जाणून घ्या ही सोपी रेसिपी
कृती:
- केळी, गाजर बारीक चिरुन घ्यावेत.
- त्यात बारीक चिरलेली कांद्याची पात, हिरवी मिरची टाकावी.
- चवीनुसार मीठ आणि साखर टाकावी.
- वरुन लिंबाचा रस टाकावा.
- सर्व एकत्र करुन सॅलेड पाच मिनिटांमध्ये तयार होईल.