Basundi Recipe : सध्या गणेशोत्सव सुरू आहे. बाप्पांच्या नैवद्यासाठी दररोज काय स्पेशल करावे, हे सुचत नाही का? टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला गणपती बाप्पासाठी एक गोड रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही घरी बासुंदी करू शकता. घट्ट अन् मलाईदार बासुंदी कशी बनवावी, यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :

  • दूध
  • साखर
  • बदाम
  • पिस्ता
  • चारोळी
  • वेलची पूड

हेही वाचा : दहा मिनिटांमध्ये बनवा खमंग शेंगदाणा चटणी, सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती :

  • एका पातेल्यात दूध उकळत ठेवावे.
  • त्यात स्टीलची वाटी टाकावी जेणेकरुन दूध उतू जाणार नाही.
  • दुध चांगले आटवल्यानंतर त्यात प्रमाणानुसार साखर टाकावी
  • त्याबरोबर पाण्यात आधीच भिजवलेले बदाम पिस्ता टाकावे आणि चारोळी घालावी.
  • दूध आणखी पाच ते सात मिनिटे उकळत ठेवावे.
  • गॅस बंद केल्यानंतर त्यात वेलची पूड घालावी.
  • बासुंदी थंड झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवावी यामुळे ही आणखी घट्ट होईल.
  • ही मलाईदार घट्ट बासुंदी तुम्ही सर्व्ह करावी.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Basundi recipe how to make basundi a maharashtrian sweet dish ndj
Show comments