Batata Bhaji Recipe : सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाला गरमा गरम असे स्वादिष्ट खावेसे वाटते. अनेकदा आपण हिवाळ्यात आवडीने भज्यांचा बेत आखतो. कधी कांदा भजी तर कधी बटाटा भजी आवडीने खातो पण यात बटाटा भजी ही सर्वांनाच आवडतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना बटाटा भजी खायला आवडते. अनेकदा घरी बनवलेली बटाटा भजी टम्म फुगलेली नसते. त्यामुळे बहूतेक लोकं बटाटा भजी सहसा बाहेर खातात. पण टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत ज्यामुळे तुमची बटाटा भजी टम्म फुगतील आणि चविष्ठ सुद्धा होतील. ही टम्म फुगलेली बटाटा भजी कशी बनवायची, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला ही सोपी रेसिपी जाणून घ्यावी लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

बटाटा
बेसन
तांदळाचे पीठ/बारीक रवा
ओवा
हिंग
बारीक चिरलेली कोथिंबीर
लाल तिखट
मीठ
सोडा
तेल

हेही वाचा : Peruchi Bhaji : अशी बनवा पेरूची चविष्ठ भाजी, रेसिपी लगेच नोट करा

कृती

सुरुवातीला तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणानुसार बटाटे घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या.
त्यानंतर बटाटे सोलून घ्या
आणि एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हे सोलून ठेवलेले बटाटे ठेवा.
पुढे या बटाट्याच्या गोल आकाराच्या चकत्या कापाव्यात.
या बटाट्याच्या चकत्या पाण्यात स्वच्छ धुवून ठेवा.
त्यानंतर एका दुसऱ्या भांड्यामध्ये बेसन घ्यावे.
त्यात थोडे तांदळाचे पीठ घ्या.
जर तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही बारीक रवा घेऊ शकता.
त्यात ओवा, हिंग आणि चवीनुसार मीठ टाका
आता पाणी घालून नीट पीठ भिजवून घ्या
त्यात शेवटी लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिमुटभर सोडा घाला.
एका कढईत तेल गरम करा.
बटाट्याचा एक एका काप पिठामध्ये बुडवून घ्या
आणि हे काप कमी आचेवर तेलातून तळून घ्या
भजी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे.
बटाटा भजी तयार होईल.
ही गरमा गरम बटाटा भजी तुम्ही हिरव्या मिरचीच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Batata bhaji recipe how to make aloo bhaji food lovers best food for winter season ndj
Show comments