भारतातील सर्वात प्रतिष्ठित होम शेफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, तरला दलाल अजूनही त्यांच्या शाकाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. तरला दलाल यांना त्यांच्या कार्यासाठी पद्मश्रीनेही गौरविण्यात आले आहे. त्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपटही आला आहे ज्यात हुमा कुरेशी तरलाची भूमिका साकारत आहे. जर तुम्ही तरला दलालचे चाहते असाल आणि तरला चित्रपट पाहिल्यानंतर बटाटा मुसल्लम कसा बनवायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल संपूर्ण रेसिपी जाणून घ्या.
बटाटा मुसल्लमसाठी आवश्यक साहित्य
दिड कप छोटे बटाटे, ३ चमचे तेल, अर्धा छोटा चमचा जिरे, अर्धा कप कांदे, १ छोटा चमचा आले लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, आणि २ छोटा चमचा फ्रेश क्रीम, २ छोटा चमचा मेल्टेड बटर, १ छोटा चमचा फ्रेश क्रीम आणि १ छोटा चमचा कोथिंबीर.
हेही वाचा – अंडा तवा मसाला: झणझणीत अन् मसालेदार रेसिपी, एकदा खाऊन पाहा
बटाटा मुसल्लमचा खास मसाला कसा तयार करावा
दिड कप टोमॅटो, २ भिजवलेल्या सुक्या काश्मिरी लाल मिरच्या, १ छोटा चमचा बदाम, १ छोटा चमचा काजू, अर्धाछोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा लाल तिखट, १ छोटा चमचा जिरे पावडर, १ छोटा चमचा धने पावडर, आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला
हेही वाचा – घरीच तयार करा हेल्दी आणि टेस्टी मशरूम लॉलिपॉप्स! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी
बटाटा मुसल्लम कसा तयार करायचा?
सोललेले छोटे बटाटे गरम तेलात हलके सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. त्यांना बाजूला ठेवा.
एका खोलगट कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि कांदे घालून मध्यम आचेवर २ मिनिटे परतून घ्या.
आले लसूण पेस्ट घालून काही सेकंद परतावे.
सर्व मसाला साहित्य एकत्र करून पॅनमध्ये घालून मध्यम आचेवर २ मिनिटे शिजवा. अधूनमधून हलवत राहा.
आता त्यात तळलेले छोटे बटाटे, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी आणि १ कप गरम पाणी घालून मिक्स करा.
पुढे, २ चमचे फ्रेश क्रीम टाका, नीट मिक्स करा आणि २ ते ३ मिनिटे मध्यम आचेवर शिजवा.
वितळलेले बटर, फ्रेश क्रिम आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.