Batatyache Bharit Recipe : बटाट्याचे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. बटाट्याचा पराठा, भाजी, भजे, चटणी किंवा अनेक पदार्थांमध्ये आवडीने बटाटा टाकला जातो पण तुम्ही कधी बटाट्याचे भरीत खाल्ले आहे का? बटाट्याचे झणझणीत भरीत चवीला अप्रतिम लागते. तुम्हालाही बटाट्याचे भरीत घरी बनवायचे असेल तर ही रेसिपी लगेच नोट करा.
साहित्य
- बटाटे
- हिरव्या मिरच्या
- बारीक चिरलेला कांदा
- भाजलेले शेंगदाणे
- मेथी
- कोथिंबीर
- लसूण
- जिरे
- तेल
- हिंग पावडर
- मीठ
हेही वाचा : भेंडीची भाजी चिकट होते? अशी बनवा स्वादिष्ट मसाला भेंडी, नोट करा ही रेसिपी
कृती
- सुरुवातीला बटाटे शिजवून घ्या आणि त्याची साल काढून घ्या
- बटाट्याला सर्व बाजूंनी चीर लावा आणि बटाटा चांगला भाजून घ्या.
- हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे बारीक वाटून घ्या.
- एका कढईत गरम तेल करा.
- त्यात जिरे टाका. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाका.
- हिंग पावडर आणि बारीक वाटून घेतलेले हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिऱ्याचे मिश्रण त्यात टाका. चांगले परतून घ्या.
- भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकावा.
- त्यानंतर भाजलेले बटाटे बारीक करुन त्यात टाकावे आणि चांगल्याने परतून घ्यावे.
- त्यात चवीनुसार मीठ टाका
- त्यानंतर त्यात स्वच्छ धुतलेली मेथी टाका
- आणि शेवटी त्यात कोथिंबिर टाका आणि कमी आचेवर चांगले परतून घ्या
- बटाट्याचे झणझणीत भरीत तयार होईल.