नीलेश लिमये

साहित्य:

४०० ग्रॅम पापलेट/रावस, चवीनुसार मीठ, मिरपूड, चिली फ्लेक्स, लिंबूरस, तळणीसाठी तेल.

बॅटरसाठी – १ वाटी मैदा, अर्धी वाटी कॉर्न फ्लोअर, १ चमचा बेकिंग पावडर, १ अंड आणि बिअर

कृती:

मैदा, कॉर्न फ्लोअर, बेकिंग पावडर एकत्र करा. त्यात अंडे, बिअर घालून घट्टसर मिश्रण करा. माशातील काटे काढून घ्या. त्याला मीठ, मिरपूड, चिली फ्लेक्स आणि लिंबूरस माखून १० मिनिटे ठेवा.

आता कढईत तेल गरम करून घ्या. पीठाच्या मिश्रणात मासे घोळून घेऊन छान गरमागर तेलात तळून काढा.

Story img Loader