बीट आपल्या शरीरासाठी भरपूर फायदेशीर आहे, शरीरातील रक्ताची कमतरताही बिटामुळे भरुन निघते. हेच बीट आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडत नाही. मात्र त्याची पौष्टीकता पाहता, ते आपल्या आहारात असणे गरजेचे आहे. ज्यांना बीट आवडत नाही अशांसाठी आम्ही आज बिटाची भाजी रेसिपी घेऊन आलो आहोत. मोठी माणसंच काय तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील, चला तर पाहुयात याची सोपी रेसिपी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीटरूटची भाजी साहित्य :

  • २ लहान बीट
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • ८-१० लसूण पाकळ्या
  • १ कांदा
  • तेल
  • चवीप्रमाणे मीठ
  • १ टीस्पून जिरे-मोहरी
  • १ टेबलस्पून धने पावडर

बीटरूटची भाजी कृती :

  • स्टेप १: बिटाची सालं काढून घेऊन, धुऊन घेणे.किसणीने किसून घेणे. कांदा हिरव्या मिरच्या लसूण बारीक चिरून घेणे.
  • स्टेप २: गॅसवर कढईत तेल घालून तापत ठेवणे. तेल तापले, की जिरे,मोहरी, हिंग यांची फोडणी करून घेणे.
  • स्टेप ३: बारीक चिरलेला लसूण घालून, गुलाबीसर भाजून घेणे. चिरलेला कांदा घालून गुलाबीसर भाजून घेणे.
  • स्टेप ४: हळद व चवीप्रमाणे मीठ घालून घेणे. किसलेले बीट घालून व्यवस्थित परतून घेणे. झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवणे. वरून धने पूड घालून मिक्स करून घेणे.

हेही वाचा >> एक थेंबही पाणी न वापरता बनवा महिनाभर टिकणारं रस्सा भाजीचं वाटण; ही घ्या रेसिपी

  • स्टेप ४: झाकण ठेवून एक वाफ काढून घेणे. गॅस बंद करावा. बीट जास्त शिजवू नये. वरून चिरलेली कोथिंबीर घालू शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beetroot bhaji recipe in marathi benefits of beetroot srk
Show comments