वांगी, कारली, गवार, भोपळा या भाज्यांप्रमाणेच अनेकांच्या नावडतीची भाजी म्हणजे पडवळ. अनेकांच्या घरात पडवळ ही भाजी वर्ज्यच आहे. पडवळ हे नाव जरी काढलं तरी अनेक जण तोंड वेडवाकडं करतात. परंतु अनेकांच्या नावडतीच्या या भाजीचे अनेक गुणधर्म आहेत. म्हणूनच तिच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पडवळमध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, तंतूमय व पिष्टमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. चला तर आज हीच पडवळची स्टफ्ड भाजी बनवूया.

स्टफ्ड पडवळ बनवण्यासाठी साहित्य

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
ngapur Egg prices risen early this year due to increased production costs
थंडी वाढताच अंड्याच्या दरात मोठी वाढ, थंडी आणि दरवाढीचा संबंध काय?
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
white onion Alibaug, Raigad, white onion,
रायगड : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या कक्षा रुंदावणार, एक हजार हेक्टरवर पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे उद्दिष्ट
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
fake Goods Market Pune, fake Goods, Market Pune,
शहरबात… बनावट मालाच्या बाजारपेठांना रोखणार कोण?
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी

२५० ग्रॅम परवळ
एक चमचा मोहरीचे तेल
अर्धा टीस्पून जिरे
हिंग
बेसन ३ चमचे
बडीशेप पावडर दीड चमचा
धनेपूड दीड चमचा
हळद अर्धा टीस्पून
काश्मिरी लाल तिखट
जिरे पावडर अर्धा टीस्पून
बारीक चिरलेली हिरवी मिरची
आले अर्धा चमचा
आमचूर पावडर
गरम मसाला
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल

स्टफ्ड पडवळबनवण्याची पद्धत

१. सर्वप्रथम पडवळ चांगले धुवा. नंतर देठ कापून पडवळचा वरचा पातळ थर खरवडून घ्या. आता पडवळमध्ये लांब चीर द्या, जेणेकरून मसाला आत भरता येईल. तसेच परवळच्या बिया काढा.

२. आता मसाला बनवण्यासाठी कढईत मोहरीचे तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंक घाला. तसेच तीन चमचे बेसन चांगले भाजून घ्यावे.

३. बेसन भाजून झाल्यावर त्यात परवळच्या मधल्या भागाचा गर घालून भाजून घ्या. नीट भाजून झाल्यावर त्यात दीड टीस्पून बडीशेप पावडर, धने पूड, अर्धा टीस्पून हळद, काश्मिरी लाल तिखट, अर्धा टीस्पून जिरे पूड घालून मिक्स करा.

४. तसेच हिरवी मिरची, आले बारीक चिरून घाला. नंतर त्यात गरम मसाला, आमचूर पावडर घालून मिक्स करा. हा मसाला एका प्लेटमध्ये काढून त्यात मीठ घालून मिक्स करा. तयार केलेला मसाला सर्व परवळमध्ये चमच्याने दाबून भरा.

हेही वाचा >> खान्देशी पध्दतीची झणझणीत मीरची भाजी; तोंडी लावण्यासाठी मिरचीची भन्नाट रेसीपी नक्की ट्राय करा

५. आता कढईत तेल घाला आणि ते गरम झाले की सर्व परवळ घालून चांगले शिजवा. झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी परवळ शिजेपर्यंत नीट शिजवा. तुमचे स्टफ्ड परवळ तयार आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे असेच कोरडे खाऊ शकता किंवा ग्रेव्हीमध्ये घालून त्याची भाजी म्हणून खाता येते.

Story img Loader