Bengali Style Mutton Curry : बहुतेक मांसाहारप्रेमी लोकांना वेगवेगळ्या फ्लेवर्स आणि स्टाइलचे नॉनव्हेज खाणं आवडतं. यात मालवणी, कोळी नॉनव्हेज पदार्थांबरोबर बंगाली नॉनव्हेज पदार्थही लोक तितक्याच आवडीने खातात. अनेकदा हॉटेल, रेस्टॉरंटमध्येही बंगाली स्पेशल नॉनव्हेज पदार्थांची चव चाखतात. कारण बंगाली नॉनव्हेज पदार्थ त्यांच्या उत्कृष्ट चवीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे रोज एकाच चवीचं मटण खाऊन तुम्हीदेखील कंटाळला असाल तर रविवारी स्पेशल बंगाली मटण करी नक्की ट्राय करू शकता. सुगंधी गरम मसाल्यांपासून बनवली जाणारी ही बंगाली मटण करी तुम्ही रोटी, नान किंवा पराठा कशाबरोबरही खाऊ शकता. चला तर मग बंगाली मटण करी नेमकी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेऊ…

बंगाली स्टाइल मटण करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

३५० ग्रॅम मटण
१/२ कप दही
१ टीस्पून आले-लसूण पेस्ट
१ टीस्पून मोहरीचे तेल
करीसाठी : १ चमचा मोहरीचे तेल
१ तमालपत्र
१-२ काळ्या वेलची
१-२ हिरवी वेलची
१ दालचिनीची काडी
२-३ लवंग
२-३ सुक्या लाल मिरच्या
चिमूटभर साखर
१ कप चिरलेला कांदा
१ टीस्पून चिरलेले आले
१ टीस्पून चिरलेला लसूण
१-२ लहान चिरलेले बटाटे,
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
चवीनुसार मीठ
१ टीस्पून धणे पावडर
तूप आवश्यकतेनुसार
हिरवी मिरची
१ टीस्पून गरम मसाला
पाणी आवश्यकतेनुसार

Winter Special Kabab Recipe In Marathi
हिवाळा स्पेशल कबाब; चव अशी की एकदा खाल तर खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Tandoori chicken
Tandoori Chicken: तंदुरी चिकन कसं ठरलं जगातलं सर्वोत्तम ग्रिल्ड चिकन?
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Chicken tikka easy version recipe chicken starter easy recipe
Chicken Tikka Recipe: नॉन व्हेजचा बेत आखताय? मग अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘चिकन टिक्का’, झटपट होईल रेसिपी तयार
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
How To Make Dahi Kabab In Marathi
Dahi Kabab Recipe : फक्त १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा ‘दही कबाब’; कुरकुरीत, रेस्टोरंटसारखे कबाब पाहून तोंडाला सुटेल पाणी

Kitchen Jugaad: , गॅस शेगडीवर वॅसलिन लावताच झाली कमाल; video पाहाल तर दररोज कराल ‘हा’ उपाय

बंगाली स्टाइल मटण करी बनवण्याची कृती

मटण करी बनवण्यासाठी सर्वात आधी मटण मॅरीनेट करावे लागेल. यासाठी मटणाचे तुकडे आधी नीट धुवून घ्या आणि नंतर एका भांड्यात दही, आले-लसूण पेस्ट आणि मोहरीचे तेल मिसळा.

यानंतर ते झाकून सुमारे २-३ तास फ्रीजमध्ये ठेवा. आता कढईत तेल गरम करून त्यात दालचिनी, काळी आणि हिरवी वेलची, सुकी लाल मिरची, तमालपत्र, लवंगा आणि चिमूटभर साखर घाला. हे मिश्रण चांगले मिसळा आणि त्यात चिरलेला कांदा घाला. कांदा सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. चिरलेले आले, लसूण आणि हिरवी मिरची, धणे पावडर, गरम मसाला असे सर्व मसाले घालून हे मिश्रण तळणे सुरू ठेवा.

आता मटणाचे तुकडे आणि बटाट्याचे तुकडे कढईत शिजवलेल्या मिश्रणात ५-१० मिनिटे शिजवा. यानंतर पाणी घालून झाकण ठेवा. हे मिश्रण ३०-४० मिनिटे मंद आचेवर शिजवा.

आता शिजलेल्या मटणावर ताजी कोथिंबीर, चिरलेली हिरवी मिरची आणि थोडे तूप घाला आणि गरम सर्व्ह करा आणि खाण्याचा आनंद घ्या.