दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. त्यामुळे सध्या घरोघरी मस्त लाडू, चिवडा, चकली यांचा घमघमाट सुटला असले. मात्र, या सगळ्या फराळामध्ये बेसनाचे लाडू हा पदार्थ अनेकांच्या आवडीचा असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अनेकांच्या घरी बेसनाचे लाडू हे हमखास करण्यात येतात. यामध्ये काही जणींनी बेसनाचे लाडू करण्याची हौस असते. मात्र, लाडू करण्याची योग्य पद्धत माहित नसल्यामुळे अनेकदा हा लाडू करण्याचा बेत फसतो. त्यामुळेच बेसनाचे लाडू नेमके कसे करावेत याची कृती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेसन लाडू साहित्य –

  • ३ वाटी बेसन
  • २ वाटी पीठी साखर
  • १ वाटी साजूक तूप
  • १ चमचा वेलचीपूड
  • ड्रायफ्रूट सजावटीसाठी आवडीप्रमाणे

बेसन लाडू कृती –

स्टेप १

सगळ्यात आधी काढई किवां पॅन मध्ये चार मोठे चमचे साजूक तूप टाकून घ्या. साजूक तूप नसेल तर डालडा पण वापरू शकता.
नंतर यामध्ये दीड कप बेसन घाला.

स्टेप २

त्यानंतर हे मिश्रण गॅस वर ठेवा आणि मंद आचेवर भाजून घ्या भाजत असताना एक – दोन चमचे तूप टाका. तुमच्या प्रमाणानुसार तूप टाका.

स्टेप ३

हे मिश्रण भाजत असताना हे मिश्रण हलवत राहा जेणे करून ते काढई किवां पॅन ला चिकटणार नाही. हे बेसन चे मिश्रण लालसर रंग येईपर्यंत भाजा. १० मिनिट भाजल्यावर हा रंग येईल.

स्टेप ४

बेसनाचा रंग लाल झाल्यवर गॅस बंद करा आणि त्यामध्ये वेलची पूड एक चमचा टाका आणि त्यानंतर तुमच्या आवडी नुसार काजू टाका. आता हे मिश्रण चांगले मिसळा आणि बेसन थोडे थंड होईपर्यंत बाजूला ठेवा.

स्टेप ५

हे मिश्रण कोमाट झाल्यवर यात दोन कप पिठीसाखर घाला. हे प्रमाण तुमच्या आवडी नुसार कमी जास्त पण करू शकता. आता हे मिश्रण चांगले एकजीव करा आणि लाडू वळायला घ्या.

हेही वाचा >> दिवाळीसाठी १/२ किलोच्या प्रमाणात तोंडात विरघळणारी नानकटाई; झटपट रेसिपी नोट करा

स्टेप ६

लाडू वळताना त्यावर एक मनुका लावा आणि लाडू वळा. आता हे वळलेले एका प्लेट मध्ये काढा आता हे लाडू खायला तयार आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Besan ladoo recipe in marathi how to make perfect besan laddu srk