रोज वेगळी काय भाजी करायची असा प्रश्न तमाम महिलांसमोर असतो. सतत आवडीच्या म्हणजे बटाटा, भेंडी, फ्लॉवर यांसारख्या भाज्या करणे शक्य नसते. त्यातून म्हणावे तसे पोषक घटकही मिळत नाहीत. त्यामुळे कधी ना कधी आपल्याला न आवडणाऱ्या दुधी भोपळा, दोडका, घोसाळं, कारलं यांसारख्या भाज्यांचाही नंबर येतोच. अनेकदा आपल्याला या भाज्या मुकाट्याने खाव्या लागतात नाहीतर आई किंवा बायको ओरडते. यामध्ये दोडका लाडका नसेलही, पण दोडक्याची भाजी खाण्याचे शरीराला खूप फायदे आहेत, ही भाजी बनवयाची एक वेगळी आणि टेस्टी पद्धत आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, यानंतर तुम्हीही आडीने दोडक्याची भाजी खाल..
दोडक्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य
- ३-४ दोडके
- २ कांदे स्लाइसमध्ये कापलेले
- २ टोमॅटो चिरलेले
- ३ -४ लसूण पाकळ्या
- १ इंच आल्याचा तुकडा
- ३ हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर बारीक चिरलेली
- २ ते ३ चमचे देशी तूप
- हळद, लाल तिखट
- धने पावडर
- चवीनुसार मीठ
- १ चमचा जिरे
- १/२ चमचा बडीशेप
- १/४ चमचा हिंग
दोडक्याची भाजी बनवण्याची पद्धत
- सर्वप्रथम भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम दोडके चांगले धुवून सोलून घ्या. नंतर त्याचे चौकोनी तुकडे करा.
- त्यांना थोडे जाड कापून घ्या, जेणेकरून ते सहज शिजतात. आता कढईत देशी तूप टाकून गरम करा.
- तूप गरम झाल्यावर त्यात जिरे टाका. बडीशेप आणि हिंग एकत्र घाला आणि जिरे लाल झाल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण घाला.
- लसूण थोडा शिजला की हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून टाका. सोबत चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.
- कांदा ब्राऊन झाला की त्यात धनेपूड, हळद, लाल तिखट टाका. चांगले मिक्स करा.
- आता मसाल्यांसोबत चिरलेले दोडके घाला. मंद आचेवर शिजवा, म्हणजे दोडक्याचे पाणी सुकून ते शिजते.
हेही वाचा >> पितृपक्षात नैवैद्यासाठी लागणारे वडे रेसिपी, भरड बनवण्याची पद्धत व प्रमाण
- शिजायला लागल्यावर टोमॅटोचे तुकडे टाका. चवीनुसार मीठ घालून झाकून ठेवा. सुमारे ५ मिनिटांत टोमॅटो शिजतील आणि दोडके देखील शिजतील.