Besan Papdi : लहान मुलांना चिप्स, कुरकुरे, पापड, चिवडा, फरसाण खायला खूप आवडते पण बंद पाकिटातील हे पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. अशा वेळी हेच पदार्थ घरी बनवून खाल्ले तर अधिक चांगले असते. आज आपण अशाच एका पदार्थाविषयी जाणून घेणार आहोत जो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. सहसा हा पदार्थ आपण बाहेरून विकत आणतो पण तुम्ही हा पदार्थ घरीच बनवू शकता, तो म्हणजे बेसन पापडी. बाहेरून विकत आणलेली बेसन पापडी जरी चवीला उत्तम असली तर आरोग्यास हानिकारक असते. त्यामुळे घरीच बेसन पापडी बनवणे, चांगले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बेसन पापडी कशी बनवायची, आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. ही बेसन पापडी तुम्ही एकदा खाल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवून खावीशी वाटेल. विशेष म्हणजे ही बेसन पापडी तुम्ही आठवडाभर डब्यात भरून खाऊ शकता.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुरकुरीत अशी बेसन पापडी कशी बनवायची, त्याविषयी सांगितले आहेत.
व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –
बेसन पापडी कशी बनवताता?
साहित्य
- बेसन
- तेल
- मीठ
- ओवा
- पाणी
हेही वाचा : रात्री आठवणीने भिजत घाला १/२ वाटी साबुदाणा; सकाळी १० मिनिटांत बनवा पौष्टिक ‘पालक पोहे वडे’
कृती
- अर्धा किलो बेसन घ्या.
- त्यात ५० ग्रॅम तेल टाका.
- चवीपुरते मीठ घ्या
- एक चमचा ओवा टाका.
- त्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करा.
- थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्या पीठाला ५ ते ६ मिनिटे मळून नरम करा.
- त्यानंतर भिवजलेले पीठ पापडी बनवण्याच्या साशा किंवा मशीनमध्ये टाका.
- त्यानंतर मध्यम आचेवर गरम तेलावर बेसन पापडी तळून घ्या.
- अशाप्रकारे बेसन पापडी तयार होईल.
- ही पापडी तुम्ही बारीक करून फरसाण, चिवडामध्ये टाकू शकता.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : रात्रीच्या उरलेल्या भाकरीपासून बनवा पौष्टिक उपमा; पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती
swast_ani_mast_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मार्केटसारखी खुसखुशीत बेसन पापडी बनवा आता घरच्या घरी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला बेसन पापडी खूप आवडते” तर एका युजरने लिहिलेय, “पापडी आणि गाणे दोन्हीही आवडले.” तर एका युजरने लिहिलेय, “यामध्ये एक चमचा हिंगची गरज होती.” अनेक युजर्सना ही रेसिपी खूप आवडली असून कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहेत.