Besan Roll Recipe In Marathi : प्रत्येक दिवशी खायला काही तरी नवीन बनवावे असे सगळ्यांनाच वाटते. लहान मुलांना तर नवनवीन पदार्थ चाखण्यात मज्जाच येते. तुम्ही अनेकदा हॉटेलमध्ये गेल्यावर स्प्रिंग रोल हे स्टार्टर्स म्हणून खाल्लं असेल. ही अतिशय आवडती, अतिशय लोकप्रिय डिश आहे. स्प्रिंग रोल हा मुख्यतः एक चायनीज पदार्थ आहे. त्यात न्युडल्स किंवा वेगवेगळ्या भाज्यांचे मिश्रण भरून ते स्टफ केले जाते. तर आज आपण स्प्रिंग रोल न बनवता ‘बेसन रोल’ (Besan Roll Recipe) कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत.

प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात बेसन पीठ हे हमखास असते. बेसनापासून अनेक पाककृती बनवता येतात. बेसनाचा वापर भाजी, फससान-नमकीन पदार्थ आणि गोड पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.

साहित्य :

१. एक वाटी बेसन
२. एक चमचा मैदा
३. ताक
४.मीठ
५. हळद
६. साखर ,पिठीसाखर
७. हिंग
८. ओलं खोबरं
९. कोथिंबीर, दोन मिरच्या
१०. लिंबूरस

रोलसाठी दीड वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी बारीक चिरून कोथिंबीर, बारीक चिरून मिरची, दोन मिरच्या, अर्धा चमचा पिठीसाखर, एक चमचा मीठ, एक चमचा लिंबूरस, चार मोठे चमचे तेल, हिंग, मोहरी (फोडणीसाठी) आदी साहित्य लागेल.

हेही वाचा…Raw Banana Recipe : कच्ची केळीपासून बनवलेला हा पदार्थ कधी खाल्ला आहे का? मग रेसिपी लगेच लिहून घ्या

कृती :

१. बेसन पिठात मैदा, ताक, पाणी, मीठ, हळद, हिंगपूड, चिमूटभर साखर घालून एकजीव करून घ्या. (टीप -गुठळ्या अजिबात राहू देऊ नका).
२. मंद आचेवर बेसनपीठ घोटावे.
३. स्टीलच्या स्वछ पुसून घेतलेल्या ताटावर पीठ पसरवून घ्या.
४. दुसरीकडे तेलात हिंग, मोहरीची खमंग फोडणी करून घ्या.
५. त्यातील अर्धी फोडणी ताटावर पसरलेल्या पिठावर ओतावी.
६. रोलची रुंदी हवी असेल त्याप्रमाणात सुरीने रेघा आखून-ओढून ठेवाव्या. नंतर त्यावर खोबऱ्याचे सारण पसरावे. पिठावर मारलेल्या रेघांनुसार रोल वळत जावा. तयार रोल्सवर उरलेली फोडणी ओतावी.
७. अशाप्रकारे तुमचे ‘बेसन रोल्स’ (Besan Roll Recipe) तयार.

बेसनचे आरोग्यदायी फायदे :

बेसन हे पौष्टिक घटकांनी समृद्ध मानले जाते. बेसनाचे भजी जवळजवळ प्रत्येक भारतीय घरातील पहिली पसंती आहेत. बेसनामध्ये असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर महत्त्वाची खनिजे हाडे मजबूत करण्यास मदत करतात