Bhakari Recipe : झुणका भाकर हा महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमधील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. खरं तर भाकर ही पिठलं, झुणका, ठेचा इत्यादी पदार्थांबरोबर आवडीने खाल्ली जाते. अनेक जणांना पोळीपेक्षा भाकर खायला आवडते. पौष्टिक ही अत्यंत पौष्टिक असून जेवणाचा स्वाद वाढवते. काही लोकांना भाकर नीट बनवता येत नाही. नीट भाकर थापता येत नाही त्यामुळे इच्छा असूनही काही लोक भाकर बनविणे टाळतात पण आता टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत. न थापता तुम्ही सुरेख भाकर बनवू शकता. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? त्यासाठी तुम्हाला एका व्हायरल व्हिडीओमधील रेसिपी पाहावी लागेल. या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही न थापता ज्वारीची भाकरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. (Bhakari Recipe how to make bhakri without giving shape by hand jowar bhakri)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओमध्ये सांगितलेले साहित्य

  • तेल
  • पाणी
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • मीठ
  • ज्वारीचे पीठ

हेही वाचा :VIDEO: विकेंड होईल खास! पनीरपासून बनवा ‘हा’ पदार्थ; झटपट होणारी सोपी रेसिपी लगेच लिहून घ्या

पाहा व्हायरल व्हिडीओ

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

  • सुरूवातीला गॅसवर एक कढई ठेवा. त्यात तेल गरम करा त्यानंतर त्यात दोन कप पाणी टाका.
  • पाणी टाकल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
  • थोडे उकळू द्या आणि त्यानंतर त्यात दोन कप ज्वारीचे पीठ टाका. हे मिश्रण एकत्र करा.
  • त्यानंतर कढई गॅसवरून खाली ठेवा आणि १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.
  • पीठ थंड झाल्यावर हाताने चांगलं मळून घ्या.
  • त्यानंतर या पीठाचे लहान लहान गोळे घेऊन पोळीप्रमाणे लाटून घ्या.
  • त्यानंतर गरम तव्यावर भाकरीला दोन्ही बाजूने तूप लावून भाजून घ्या.
  • न थापता ज्वारीची भाकरी तयार होईल.

हेही वाचा : खानदेशी पद्धतीने करा घोसाळ्यांचे भरीत; भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवी ही रेसिपी

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान झाली भाकरी” तर एका युजरने लिहिलेय, “काय पण करा. कितीही नवीन पद्धती आणा पण ती जुनी पद्धत आहे, भाकरी थापून करायची. त्यामध्ये जे आहे चे कधीच दुसऱ्या कुठल्या भाकरीमध्ये येणार नाही.” आणखी एका युजरने लिहिलेय, “काही जणांना नाही जमत प्रयत्न करूनही थापून भाकरी करणं… त्यांना सोप्पं जाईल असं करायला.. हरकत नाही सगळेच सुगरण असायला हवेत असं काही नाही..”