मंदिरातल्या महाप्रसादातली बटाट्याची भाजी बहुतेकांनी नक्कीच खाल्लेली असेल. साधी विशेष मसाले आणि सामग्रीचा वापर न करताही केलेली भाजी चवीला आणि रंगाला एकदम छान असते. रस्साही दाट असतो. अशी भाजी घरी पुरी/ पराठ्यांसोबत करायची म्हटलं तर भंडाऱ्यातल्या भाजीप्रमाणे जमतंच नाही. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी हीच खास रेसिपी घेऊन आलो आहोत. या पद्धतीनं केली तर अशी भाजी घरीही करणं सहज शक्य आहे.
भंडारा स्पेशल आलू टमाटर रस्सा भाजी साहित्य
- २ मोठ्ठे बटाटे
- ४ टोमॅटो
- २ हिरव्या मिरच्या
- १/२ इंच आलं
- २ टेबलस्पून तेल
- १ टीस्पून जीरे
- १/४ टीस्पून हिंग
- १/४ टीस्पून हळद
- १/२ टीस्पून तिखट
- १ टीस्पून धने पूड
- १/२ टीस्पून गरम मसाला
- १ टीस्पून आमचूर पावडर/ चाट मसाला
- १ टेबलस्पून कसुरी मेथी
- २ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
- १/२ टीस्पून मीठ
- २ कप गरम पाणी
भंडारा स्पेशल आलू टमाटर रस्सा भाजी कृती
१. रेसिपीला सुरुवात करताना वर दिलेले सर्व साहित्य आणि बटाटे उकडून घेतले.टोमॅटो उकडून करून घेतले. त्यानंतर त्याची साल काढून छोटे तुकडे करून घेतले.
२. पॅनमध्ये तेल घालून त्यात जीरे तडतडू दिले.नंतर मिरची, आलं कुटून त्यात घातले. छान परतून नंतर हिंग हळद व बाकी मसाले घालून थोडे पाणी घालून छान परतले.
३. आता त्यात टोमॅटो घालून छान शिजू दिले. मीठ घातले.
४. आता उकडलेले बटाटे हाताने कुस्करून त्यात घातले.कस्तुरी मेथी घातली आणि गरम पाणी घालून छान उकळी आणली.
हेही वाचा >> या उन्हाळ्यात बनवा फक्त १ कप तांदळाच्या ७० पापड्या; तिप्पट फुलणारे वाफेवरील तांदळाचे सालपापड
५. कोथिंबीर वरून घालून तयार रस्सा भाजी बाउल मध्ये काढून सर्व्ह केली.