Bhaubij 2024 Diwali recipe in marathi देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशभरात दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. भारताच्या प्रत्येक भागात दिव्यांचा हा सण मोठ्या साजरा केला जात असून हा सण भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो. याच दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला मिठाई खावीशी वाटते, यातच दिवाळीत घरोघरी पाहायला मिळणारी मिठाई म्हणजे काजू कतली. बरेचजण मिठाई बाहेरुन आणतात. घरी कुणी करत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी ही रेसिपी कशी करायची हे सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात घरच्या घरी सोप्या पद्धतीत काजू कतली कशी करायची. त्यामुळे आता दिवाळी आणि भाऊबीजच्या दिवशी बनवा मार्केट सारखी परफेक्ट काजुकतलीची रेसिपी…

काजू कतली साहित्य

easy recipe of Balushahi
दिवाळीत लाडू, करंज्या बनवायला वेळ नाही? मग किमान बालूशाहीची ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Kaju katli recipe diwali special Kaju katli at Home easy recipe
Kaju Katli Recipe: दिवाळी स्पेशल ‘काजू कतली’ बनवायचीय? मग घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने ट्राय करा रेसिपी
Lakshmi Pujan recipe motichoor ladoo recipe in marathi
Lakshmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेला घरीच बनवा मोतीचूर लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
tasty and nutritious palak pare recipe
झटपट बनवा चविष्ट अन् पौष्टिक पालक पाऱ्या; वाचा परफेक्ट रेसिपी
karanji recipe in marathi homemade karanji karanji diwali faral recipe in marathi
एकदम पातळ आवरणाची आणि भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत करंजी; दिवाळीच्या फराळाला परेफेक्ट रेसिपी
tomato rice
रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी

१ कप काजू
१/४ कप मिल्क पावडर
३/४ कप साखर
१/४ कप+ २ टेबलस्पून पाणी
काजू कतली कृती

स्टेप १

काजूची बारीक पावडर करून घ्या. यानंतर बारीक चाळणीने पावडर चाळून घ्यावे. त्यामधे आता मिल्क पावडर मिसळून घ्या.

स्टेप २

आता कढईत साखर घालून त्यात साखर बुडेल इतपत पाणी घालून पाक करुन घ्या. पाक दोन तारी झाल्यावर गॅस बंद करा. आता त्यामध्ये वरील मिश्रण घालून चांगले मिसळून घ्या. परत गॅस चालू करा. मिश्रणाचा गोळा होऊ लागला की गॅस बंद करा.

हेही वाचा >> एकदम पातळ आवरणाची आणि भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत करंजी; दिवाळीच्या फराळाला परेफेक्ट रेसिपी

स्टेप ३

लगेचच बटर पेपरवर हे कढईतले मिश्रण घालून पटपट लाटून घ्या. तुम्हाला आवडत असल्यास चांदीचा वर्ख लावा.

स्टेप ४

यानंतर वड्या पाडून डिलिशिअस् काजू कतली सर्व्ह करा. अशाप्रकारे तुमची काजू कतली तयार आहे.