Bheja Fry Masala Recipe In Marathi: भेजा फ्राय हा नॉन व्हेज प्रेमींचा आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. आपल्याकडे अनेक हॉटेल्स, फास्ट फूड स्टॉल्सवर हा पदार्थ लोक चवीने खात असतात. अनेक नॉन व्हेज प्रेमींसाठी भेजा फ्राय विकपॉइंट असतो. पण प्रत्येक वेळी बाहेर हॉटेलमध्ये जाऊन हा पदार्थ खाणे कंटाळवाणे ठरु शकते. शिवाय यामध्ये वेळ देखील जास्त जाऊ शकतो. अशा वेळी घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून झटपट भेजा फ्राय मसाला बनवता येतो. काहीतरी चमचमीत आणि चवदार खायचं असल्यास भेजा फ्राय मसाल्याचा बेत करता येतो.

साहित्य –

  • १ भेजा
  • ३ कांदे बारीक चिरलेले
  • २ चमचे वाटलेली लसूण
  • १ टॉमेटो
  • २ चमचे गरम मसाला
  • ३ चमचे लाल तिखट
  • २ मोठे चमचे तेल
  • २ तुकडे दालचिनी
  • १ लवंग
  • १ तमालपत्र
  • मीठ चवीनुसार
  • अर्धी वाटी पाणी
  • अर्धी वाटी कोथिंबीर

कृती –

  • भेजा अलगद धुवून घ्या, कढईत तेल टाकून गरम करा.
  • त्यात दालचिनी, तमालपत्र, लवंग घाला.
  • चिरलेला कांदा टाकून परता. वाटलेला लसूण व टॉमेटो टाका.
  • गरम मसाला, लाल तिखट टाकून परता.
  • झालेल्या मसाल्यात मीठ टाका.
  • भेजाचे बारीक तुकडे करून त्यात टाका.
  • पाणी टाकून १० मिनिटे शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर टाका.

(भेजा फ्राय मसाला ही रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेण्यात आली आहे.)

Story img Loader