आजकाल भरपूर लोक भाज्या खाण्याचा कंटाळा करतात किंवा एखादी भाजी आवडत नसेल तर ती भाजी खाणं टाळतात. यामध्ये मग कारलं असो, शिमला मिरची असो किंवा भेंडी असो अशा अनेक भाज्या खायला लोक टाळाटाळ करतात. तसेच भेंडी ही भाजी भरपूर लोकांची न आवडती भाजी असते तर काही लोकांची ती आवडती भाजी असते. पण तुम्हाला माहितीये का भेंडी खाल्ल्याने शरीराला अनेक लाभदायक फायदे होतात. त्याचबरोबर आज आम्ही तुमच्यासाठी भेंडींच्या भाजीची खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आपण पाहुयात नारळाच्या रसातली भेंडीची भाजी कशी बनवायची.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारळाच्या रसातली भेंडीची भाजी साहित्य

१/४ किलो भेंडी
मीठ
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून हळद
तेल
कढीलिंबाची पाने
१ टीस्पून धने
४ लवंग
३ मिरी
१ दालचिनीचा इंचभर तुकडा
१/२ वाटी ओलं खोबरं

नारळाच्या रसातली भेंडीची भाजी कृती

१. भेंडीला मध्ये चीर देऊन एका भेंडीचे दोन तुकडे करा. त्यांना मीठ चोळून ठेवा.

२. तेल तापवून मोहरी, हिंग, कढीलिंब, हळद फोडणी करा. चिरलेली भेंडी घालून भराभर परतून घ्या. एकीकडे ओलं खोबरं वाटून घ्या. अख्खे मसाले जाडसर वाटून घ्या. भेंडी परतल्यावर मसाले घाला. लाल तिखट घाला.

हेही वाचा >> रवा न भिजवता, चीक न पाडता बनवा झटपट चौपट फुलणारी रवा कुरडई; जाणून घ्या कृती

३. वाटलेलं खोबरं घाला. वाटीभर पाणी घालून चांगली उकळी आणा. भेंडीला मीठ आधीच चोळून ठेवले होते. त्यामुळे चव बघून लागलं तर मीठ घाला. अशाप्रकारे आपली भाजी तयार आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhendichi bhaji recipe in marathi naralachya rasatali bhendi recipe in marathi srk