रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश मराठी घरांमध्ये पाहायला मिळते. काहीजणांकडे तर रविवारी ठरवून नॉन व्हेज खाल्ले जाते. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे घरामध्ये सर्वजण असतात. अशा वेळी आराम करायच्या दिवशी चमचमीत काहीतरी खायला मिळालं तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असते.प्रत्येक सन्डेला चिकन,मटण खाऊन कंटाळा येतो, तेव्हा पटकन होणारा पदार्थ करावा असे वाटते,मग हा पदार्थ छान आहे. चला तर मग आज पाहुयात काळे मासे
काळे मासे फ्राय साहित्य
- काळे मासे
- २ चमचे मसाला
- १ चमचा हळद
- चवीप्रमाणे मीठ
- १ चमचा लिंबू रस
- सहा-सात लसणाच्या पाकळ्या
- तळण्यासाठी तेल
काळे मासे फ्राय कृती
स्टेप १
प्रथम काळे मासे स्वच्छ धुऊन घ्यावे. त्याला थोडे मीठ व लिंबू लावून पाच मिनिटे ठेवावे नंतर त्याला मसाला हळद घालून ठेवावे.
स्टेप २
मग त्यात मीठ, हिरवा मसाला, आगुळं, आललसुण कोथिंबीर पेस्ट टाकून चांगले ढवळून घेतले.
हेही वाचा >> खानदेशी पद्धतीनं करा झणझणीत “लहसुणी गवार” ५ मिनिटांत बनवी ही रेसिपी
स्टेप ३
गॅसवर तवा ठेवून तो गरम झाल्यावर त्यात थोडे तेल घालावे व लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात. गोल्ड कलरच्या झाल्यावर मसाला लावलेले मासे त्यात घालून चांगले शालो फ्राय करून घेणे.