बोंबील फ्राय, बोंबलाचं कालवण तसेच बोंबील भात तुम्ही आतापर्यंत खाल्लं असेल. तसेच चिकन चिली, सोया चिलीसुद्धा खाल्ली असेल पण तुम्ही कधी बोंबील चिली रेसिपी खाल्ली आहे का? नाही ना. चल तर आज जाणून घेऊयात बोंबील चिलीची सोपी रेसिपी. बोंबील च्या सेवनामुळे डोळ्या संबंधीचे काही विकार असतील तर ते नष्ट होत असतात. केसांसाठी देखील बोंबील खूपच उपयुक्त मानले जातात. केस गळतीची समस्या असेल तर अशा समस्या साठी देखील बोंबील खूपच फायदेशीर ठरतात.
बोंबील चिली साहित्य
ओले बोंबील ६ मध्यम तुकडे करून
१/२ चमचा हळद
१ चमचा गरम मसाला
१ चमचा आलं, कोथिंबीर
१ चमचा लसूण,
१ चमचा हिरवी मीरची ही पेस्ट ( आलं १ तुकडा, ५ लसूण,)
२ शिमला मिरची
२ चमचा आलं लसूण पेस्ट
२ हिरवी मिरची
तेल, चवीनुसार मीठ
१ चमचा रवा
१/२ चमचा तांदळाचे पीठ
१ मोठा सफेद कांदा
१/२ कप कोबी उभा चिरलेला
१.५ टीस्पून सोया साँस
१ चमचा टोमॅटो केचप
१ चमचा रेड चिली साँस
बोंबील चिली कृती
१. प्रथम बोबिल मॅरीनेट करण्यासाठी त्याला हळद, हिरवा मसाला पेस्ट, गरम मसाला व थोडं मीठ टाकून मिक्स करून फ्रीज मध्ये 15 मिनिट ठेवली.
२. बोंबील डीप फ्राय करण्यासाठी तव्यावर ४ चमचे तेल टाकले व बोंबील पिठामध्ये मिक्स करून चांगले आवळून कुरकुरीत भाजून घेतले.
३. बोंबील कुरकुरीत फ्राय तयार.
४. आता चिली करण्यासाठी कांदा व शिमलामीरचीचे मध्यम मोठे तुकडे करून घेतले. कोबी उभा चिरून घेतला.
५. एक चमचा तेल टाकून प्रथम आलं लसूण पेस्ट परतवून घेतली नंतर कांदा २ मिनिट परतवून घेतला. मग शिमलामीरची परतवून घेतली. मग कोबी परतवून घेतला. सोया, रेड चिली व केचप टाकून चांगलं परतवून घेतले.
६. चिली शिजल्यावर त्यात एक एक बोंबील टाकले व परतवून घेतले. वरतून कोथिंबीर टाकून खाण्यासाठी तयार बोंबील चिली.
हेही वाचा >> घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल झणझणीत फिश फ्राय; स्टार्टर फिश फ्राय खाल तर खातच रहाल…
७. वरील बोंबील चिलीमध्ये मीठ ऍड केले नाही कारण साँसमध्ये मीठ असत व बोंबीलला मॅरीनेट करताना मीठ लावले होते.