मासे, माश्याचे कालवण, फिश फ्राय असे पदार्थ खवय्यांच्या अगदी आवडीचे असतात. बोंबील बाजारांमध्ये अगदी सहजपणे मिळत असतात. बोंबील हे खाऱ्या पाण्यातले व गोड्या पाण्यातले असे दोन प्रकारचे असतात. बाहेरून दिसायला हे अतिशय विचित्र दिसत असले तरी खाण्यामध्ये याचा अंदाज काही निराळाच असतो खाण्यासाठी हे खूपच स्वादिष्ट लागत असतात. केसांसाठी देखील बोंबील खूपच उपयुक्त मानले जातात. केस गळतीची समस्या असेल तर अशा समस्यासाठी देखील बोंबील खूपच फायदेशीर ठरतात. चला तर मग पाहुयात सुक्या बोंबलाचे खेंगाट रेसिपी कशी करायची.
बोंबलाचे खेंगाट साहित्य
१. ओले बोंबील, २ मोठे टोमॅटो बारीक चिरलेले
२. ४ हिरव्या मिरच्या
३. ८-९ लसून पाकळ्या
४. ७-८ कडिपत्ताची पाने
५. आवडीनुसार कोथंबीर
६. ५-६ कोकम
७. ३ टेबलस्पून लाल तिखट
८. २ टिस्पून हळद
९. चवीनुसार मीठ
१०. ३ टेबलस्पून तेल
बोंबलाचे खेंगाट कृती
१. स्वच्छ धुऊन घ्यावे व मधून कापून घ्यावे. (आपण तळताना मधून कापून चपटे करतो तसे करू नये). एका पॅनमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो व कोथिंबीर,लसूण,कडीपत्ता,मिरची, कोकम सर्व साहित्य एकत्र घ्यावेत त्यामध्ये सर्व मसाले टाकावे मीठ टाकावे.
२. आता त्यामध्ये बोंबील टाकावे. आधी तेल टाकावे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व व्यवस्थित पसरवून घ्यावे.
हेही वाचा >> झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
३. आता हा पॅन मंद आचेवर ठेवून द्यावा. व वरून झाकण लावून घ्यावे. दहा मिनिटानंतर चेक करा व पाणी सर्व आठवण केलेलं असतं व बोंबील व्यवस्थित शिजलेले असतात मग झाकण काढून दोन ते तीन मिनिटे शिजवावे अशा प्रकारे तयार होईल आपलं बोंबलाच खेंगाट.
रेसिपी कुकपॅडवरुन साभार.