दीपा पाटील
साहित्य
आणखी वाचा
* १० ते १२ मोठे सुके बोंबील * चिंचेचा कोळ
* ४ मोठे कांदे बारीक कापून
* २ हिरव्या मिरच्या * १ चमचा हळद
* २ मोठा चमचा लाल तिखट
* अर्धी वाटी तेल * ४ मोठे चमचे कोथिंबीर
* मीठ चवीनुसार
कृती
सर्वात आधी बोंबील कोमट पाण्यात १५ मिनिटे ठेवा. नंतर त्यातील मधला काटा काढून टाका. कढईत तेल गरम करा. त्यात कांदा मिरची परतवून घ्या. नंतर हळद, लाल तिखट व मीठ टाकून चांगले एकत्र करा व नंतर त्यात बोंबील टाका व चिंचेचा कोळ व कोथिंबीर टाकून चांगले परतवून एक वाफ आणा.