How to make Boondi curry recipe: रोज रोज त्याच त्याच भाज्या बनवून कंटाळा आला की जेवणाला काय वेगळं बनवानं सुचत नाही. तेच तेच खाऊन घरातील मंडळींनाही कंटाळा आलेला असतो. काय भाजी बनवावी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुम्ही झटपट बूंदी करी बनवू शकता. बूंदी करी बनवणे अतिशय सोपे असून त्यासाठी कोणत्याही तयारीची गरज नाही उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भन्नाट बूंदी करी बनवणे शक्य आहे. चला तर जाणून घेऊया चटकदार बूंदी करी रेसिपी कशी बनवायची.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बूंदी करी साहित्य

  • १०० gm बूंदी बनवा किंवा रेडीमेड घ्या
  • २५० ग्रॅम ताजे दही,
  • काही पुदिन्याची पाने,
  • २ टोमॅटो,
  • काही कढीपत्ता,
  • २ चमचे बेसन
  • २ ग्लास पाणी
  • १ कांदा,
  • २ मिरच्या

बूंदी करी कृती

  • सर्वात आधी थोडी बूंदी बनवा किंवा रेडीमेड घ्या.
  • प्रथम एक ब्लेंडर जार घ्या आणि त्यात २५० ग्रॅम ताजे दही, काही पुदिन्याची पाने, दोन टोमॅटो, काही कढीपत्ता, दोन चमचे बेसन, २ ग्लास पाणी घाला. मिसळा आणि बाजूला ठेवा.
  • नंतर एक कांदा, दोन मिरच्या, ५, ६ लसूण आणि बीट रूटचा एक छोटा तुकडा, आल्याचा एक छोटा तुकडा यांची पेस्ट तयार करा. नंतर कढई गरम करा आणि एक सर्व्हिंग स्पून तेल घाला आणि त्यात हिंग, कढीपत्ता, मोहरी घाला. तडतडल्यावर मिक्सरची पेस्ट घाला.
  • चार मिनिटांनंतर त्यात हळद आणि धने पावडर, मिरची पावडर आणि किचन किंग गरम मसाला आणि मीठ घालून छान मिक्स करून तीन मिनिटे भाजून घ्या.नंतर दही आणि बेसनचे मिश्रण घाला. आणि छान मिसळा. सिम फ्लेममध्ये तीन चार उकळीपर्यंत शिजवा.
  • सिम फ्लेमवर दहा मिनिटे शिजल्यानंतर त्यात बुंदी घाला आणि तीन मिनिटे उकळा नंतर चिरलेल्या कोथिंबीरीने सजवा आणि गॅस बंद करा.गरमागरम बुंदी करी भात आणि चपाती बरोबर सर्व्ह करा.किंवा पराठा आणि भाज्यांसोबत सर्व्ह करा.