Bread Pizza Pockets Recipe: स्नॅक्ससाठी दररोज वेगळं काय बनवावं? किंवा मुलांना डब्यात किंवा नाश्त्याला चवदार क्रंची असं काय देता येईल या विचारत गृहिणी नेहमीच असते. रोज रोज त्याच गोष्टी खाऊन आपणही कंटाळतो. पण नवीन पदार्थ ट्राय करायचे म्हटले की ते किचकट, वेळखाऊ असतात. म्हणून मग जो झटपट करता येईल असा पदार्थ आपण मुलांना खाऊ घालतो. पण काही असे पदार्थ आहेत जे तुम्ही घरच्या घरी अगदी कमी वेळात बनवू शकता.
ब्रेड हल्ली प्रत्येक दुसऱ्या पदार्थामध्ये वापरला जातो. आज ब्रेडपासूनच आपण एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या ब्रेड पिझ्झा पॉकेट्सची रेसिपी.
हेही वाचा… बटाट्यापासून झटक्यात बनवा ‘क्रंची पोटॅटो फिंगर्स’, वाचा साहित्य आणि कृती
ब्रेड पिझ्झा पॉकेट्सचे साहित्य
अर्धी चिरलेली शिमला मिरची
अर्धा चिरलेला कांदा
स्वीट कॉर्न
२ टीस्पून चिली फ्लेक्स
२ टीस्पून ओरेगॅनो
२ टीस्पून पिझ्झा पास्ता सॉस
१ टीस्पून तंदुरी सॉस
२ टीस्पून टोमॅटो केचअप
हेही वाचा… पनीरची नवी रेसिपी! झटक्यात करा ‘क्रिस्पी पनीर बाईट्स’, एकदा खाल तर खातच रहाल
ब्रेड पिझ्झा पॉकेट्सची कृती
१. प्रथम एका बाउलमध्ये अर्धी चिरलेली शिमला मिरची, अर्धा चिरलेला कांदा, स्वीट कॉर्न, २ टीस्पून चिली फ्लेक्स, २ टीस्पून ओरेगॅनो, २ टीस्पून पिझ्झा पास्ता सॉस, १ टीस्पून तंदुरी सॉस आणि २ टीस्पून टोमॅटो केचअप घ्या.
२. हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्या.
३. त्यानंतर एक ब्रेड घ्या व त्याच्या कडा कापून घ्या.
४. या ब्रेडला लाटणीच्या साहाय्याने थोडे पातळ करून घ्या. मग यात तयार केलेलं मिश्रण घाला व बाजूने पाणी लावून त्याला सील करून घ्या.
५. त्यानंतर स्लरीमध्ये याला बुडवा.
६. २ चमचे कॉर्न फ्लोअर, १ टीस्पून मैदा आणि पाणी घेऊन स्लरी तयार करून घ्या.
७. स्लरीमध्ये बुडवून झाल्यानंतर याला ब्रेंड क्रंब्सने कोट करा.
८. हे ब्रेड पिझ्झा पॉकेट्स मध्यम आचेवर तळा.
९. तुमचे कुरकुरीत ब्रेड पिझ्झा पॉकेट्स तयार आहेत.
ही रेसिपी @khanaPeenaRecipes या युट्यूब चॅनलवरून घेण्यात आली आहे.