Bread Pizza Toast Recipe: नाश्त्यासाठी रोज रोज काय कराव याचा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. रोज काहीतरी नवीन करावं तर खूप वेळही जातो आणि नेहमीच रेसिपी चांगली बनेल असंही नाही. म्हणून आज आपण एक खास रेसिपी ट्राय करणार आहोत, ज्याचं नाव आहे, ‘ब्रेड पिझ्झा टोस्ट’ रेसिपी. ही रेसिपी अगदी १० मिनिटांत बनवता येईल आणि लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी आहे.
साहित्य
१ चिरलेला कांदा
१ चिरलेला टोमॅटो
अर्धी चिरलेली शिमला मिरची
१ टेबलस्पून ऑरिगॅनो
१ टेबलस्पून चिली फ्लेक्स
१ टेबलस्पून पिझ्झा पास्ता सॉस
कोथिंबीर
एक ब्रेड स्लाइस
टोमॅटो केचप
हेही वाचा… Potato Burger Recipe: बर्गरची ही नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! वाचा साहित्य आणि कृती
कृती
- एका भांड्यात १ चिरलेला कांदा, १ चिरलेला टोमॅटो, अर्धी चिरलेली शिमला मिरची, १ टेबलस्पून ऑरिगॅनो, १ टेबलस्पून चिली फ्लेक्स, १ टेबलस्पून पिझ्झा पास्ता सॉस, क्रीम आणि कोथिंबीर घ्या.
- सगळं एकत्र चांगलं मिसळा.
- एक ब्रेड स्लाइस घ्या आणि त्यावर टोमॅटो केचप लावा. त्यावर तयार केलेलं मिश्रण लावा.
- तेल किंवा बटर मध्ये हा ब्रेड स्लाइस दोन्ही बाजूंनी शिजवा.
- गरम गरम सर्व करा.
- तुमचा इंस्टंट ब्रेड पिझ्झा टोस्ट तयार आहे. आनंद घ्या.
हेही वाचा… Crispy Corn Recipe: काहीतरी चटपटीत खायचंय? अवघ्या १० मिनिटांत बनवा मक्याची ‘ही’ रेसिपी
पाहा VIDEO
*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.