Bread Potato Balls Recipe: बटाट्याचे अनेक पदार्थ आपण अनेकदा ट्राय केलं असतील. फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे काप, बटाट्याची भजी असे अनेक पदार्थ अगदी काहीच मिनिटांत आपण घरच्या घरी बनवत असतो. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं खायचं मन करतं. पण नवीन गोष्टी ट्राय करायच्या म्हटल्या तर त्यात खूप वेळही जातो. पण आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी झटपट बनेल आणि सगळ्यांना जरूर आवडेल. चला तर मग जाणून घेऊ या ‘ब्रेड पोटॅटो बॉल्स’ची रेसिपी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

३ ब्रेड

१ उकडलेला बटाटा

१ चिरलेला कांदा

१ चिरलेली हिरवी मिरची

अर्धा चमचा मीठ

अर्धा चमचा लाल मिरची पूड

अर्धा चमचा हळद

अर्धा चमचा धणे पूड

अर्धा चमचा गरम मसाला

कोथिंबीर

हेही वाचा…. रेस्टॉरंटची चव विसरायला! जेव्हा ढाबा स्टाईल मटार पनीर रेसिपी घरीच ट्राय कराल

कृती

  1. ३ ब्रेड घ्या. ब्रेड्सला पाण्यात बुडवून त्यातलं पाणी काढून घ्या.
  2. एका भांड्यात ब्रेड, १ उकडलेला आणि किसलेला बटाटा, १ चिरलेला कांदा, १ चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पूड, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि कोथिंबीर घाला.
  3. सर्व साहित्य चांगले एकत्र करा आणि छोटे गोळे बनवा.
  4. ब्रेड क्रम्ब्समध्ये हे गोळे घोळून घ्या.
  5. मध्यम आचेवर तळा.
  6. तुमचे स्वादिष्ट ब्रेड पोटॅटो बॉल्स तयार आहेत.

हेही वाचा… अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘हराभरा कबाब’, चवदार रेसिपी लगेच लिहून घ्या

पाहा व्हिडीओ

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.