Bread potato bites recipe: बटाट्याचे अनेक पदार्थ आपण अनेकदा ट्राय केलं असतील. फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे काप, बटाट्याची भजी असे अनेक पदार्थ अगदी काहीच मिनिटांत आपण घरच्या घरी बनवत असतो. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं खायचं मन करतं. पण नवीन गोष्टी ट्राय करायच्या म्हटल्या तर त्यात खूप वेळही जातो. पण आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी झटपट तर तयार होतेच आणि क्रिस्पी, चवदारही होते. चला तर मग जाणून घेऊया ब्रेड पोटॅटो बाइट्सची रेसिपी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… कुरकुरीसत ‘पकोडा रोल बाईट्स’ कधी खाल्ल आहे का? मग वाचा ही सोपी रेसिपी

साहित्य

उकडलेले बटाटे

चिरलेला कांदा

हिरवी मिरची

१ टीस्पून काश्मिरी लाल मिरची

१ टीस्पून मीठ

१ टीस्पून गरम मसाला

१ टीस्पून कोथिंबीर पूड

ब्रेड

कॉर्नफ्लोर

मैदा

हेही वाचा… Chilli Paneer Recipe: कुरकुरीत, चवदार ‘चिली पनीर’ कधी घरी बनवलंय का? मग ही रेसिपी नक्की वाचा

कृती

१. एका भांड्यात दोन उकडलेले बटाटे घ्या.

२. त्यात एक चिरलेला कांदा, एक चिरलेली हिरवी मिरची, १ टीस्पून काश्मिरी लाल मिरची, १ टीस्पून मीठ, १ टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून कोथिंबीर पूड घाला आणि याचे मिश्रण करून घ्या.

३. त्यानंतर हे मिश्रण ब्रेडला लावून घ्या.

४. मग ब्रेडचे ४ तुकडे करा आणि प्रत्येक तुकडा एक स्लरी मध्ये बुडवा.

५. कॉर्नफ्लोर, मैदा आणि पाण्याचं मिश्रण करून स्लरी तयार करा.

६. मध्यम ते उच्च आचेवर डीप फ्राय करा.

७. तुमचे ब्रेड पोटॅटो बाइट्स तयार आहेत.

ही रेसिपी @khanaPeenaRecipes या युट्यूब चॅनलवरून घेण्यात आली आहे.