Breakfast Recipe : दररोज नाश्त्यात काय वेगळं बनवावे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्यात सकाळच्या नाश्त्यासाठी आरोग्यदायी आणि झटपट काय बनवता येईल, याचा विचार आपण नेहमी करतो पण नेहमी नेहमी डोसा, इडली, पोहे, उपमा खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर तुम्ही ही आगळी वेगळी रेसिपी बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी खायला पौष्टिक असा आहार घेण्याची गरज असते अशात तुम्ही आंबोळी हा आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थ बनवू शकता. तांदूळ आणि उडीद डाळ आंबवून तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडू शकतो. तुम्ही लहान मुलांना टिफीनवर सुद्धा आंबोली खाण्यासाठी शकता सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय असलेला आंबोळी पदार्थ एकदा तुम्ही बनवून पाहा. हा पदार्थ कसा बनवायचा, तर त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.

साहित्य –

  • तांदूळ
  • उडीद डाळ
  • मेथी
  • तेल
  • मीठ

हेही वाचा : सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा झटपट अन् कुरकुरीत ‘पोळीचा चिवडा’ ; नोट करा सोपी रेसिपी

कृती –

  • एका भांड्यात दोन कप तांदूळ घ्या. स्वच्छ पाण्याने तीन चार वेळा धुवून घ्या.
  • त्याचप्रमाणे एक कप उडीद डाळ घ्या. ही डाळ तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्या.
  • हे दोन्ही तांदूळ आणि डाळ पाण्यात भिजवा. त्यानंतर उडीद डाळीमध्ये अर्धा चमचा मेथी टाका.
  • सहा तास तांदूळ आणि डाळ पाण्यात भिजवून घ्या.
  • सहा तासानंतर मिक्सरमधून डाळ आणि तांदूळ बारीक वाटून घ्या. डाळ आणि तांदळाचे एकत्र मिश्रण करा.
  • हे मिश्रण डोसाप्रमाणे बारीक दळून घ्या.
  • हे बारीक केलेले मिश्रण रात्रभर उबदार ठिकाणी झाकून ठेवा.
  • बारा तासानंतर या पीठामध्ये चवीपुरतं मीठ टाका.
  • त्यानंतर गॅसवर तवा गरम करा. त्यावर तेल टाका.
  • तव्यावर तेल नीट पसरवून घ्या त्यानंतर त्यावर हे मिश्रण तव्याच्या मध्यभागी टाका.
  • आणि स्पंज डोसाप्रमाणे हे मिश्रण तव्यावर पसरवून घ्या.
  • आंबोळी दोन्ही बाजूने चांगल्याने भाजून घ्या.
  • जाळीदार आंबोळी तयार होईल.
  • तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर ही गरमागरमआंबोळी खाऊ शकता.

Story img Loader