Marathwada Sushila Recipe : नेहमी नेहमी नाश्त्यात काय बनवावं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. षौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्ता निवडताना आणखी विचार करावा लागतो. तुम्ही जर दररोज पोहे, उपमा, डोसा, इडली. ढोकळा खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही एखादी हटके रेसिपी करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हटके रेसिपी म्हणजे कोणती? आज आम्ही तुम्हाला अशीच एक अनोखी आणि हटके रेसिपी सांगणार आहोत. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये वेगवेगळी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. आज आपण मराठवाड्यातील सर्वात लोकप्रिय नाश्त्याची रेसिपी जाणून घेणार आहोत. तुम्ही सुशीलाविषयी ऐकले आहे का? तुम्हाला वाटेल सुशीला म्हणजे काय? तर सुशीला हे एखाद्या मुलीचे नाव नसून पदार्थाचे नाव आहे. सुशीला हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला बनवू शकता. मराठवाड्यामध्ये हा पदार्थ सर्वात जास्त प्रमाणात बनविला जातो. चवीला अप्रतिम आणि बनवायला खूप सोपी असलेला हा पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये किंवा इतर कोणत्याही वेळी भूक लागेल तेव्हा झटपट बनवू शकता. हा पदार्थ कसा बनवायचा आणि त्यासाठी कोणते साहित्य घ्यावेत, याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
Marathwada Sushila Recipe : नाश्त्यात बनवा मराठवाड्याचा लोकप्रिय पदार्थ ‘सुशीला’, चुरमुऱ्यांपासून झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा
चवीला अप्रतिम आणि बनवायला खूप सोपी असलेला हा पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये किंवा इतर कोणत्याही वेळी भूक लागेल तेव्हा झटपट बनवू शकता.
Written by लाइफस्टाइल न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-05-2024 at 09:04 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Breakfast recipe how to make sushila marathwada special sushila recipe in marathi food news ndj