Breakfast Recipe : दररोज नाश्त्यात काय करावं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तुम्ही दररोज पोहे, उपमा, इडली, डोसा, पराठा खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही एक हटके पदार्थ बनवू शकता.तांदळाच्या पिठापासून तुम्ही एक टेस्टी रेसिपी बनवू शकता. ही रेसिपी चवीला अप्रतिम आणि बनवायला खूप सोपी आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ कसा बनवावा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या.
साहित्य
- तांदळाचे पीठ
- बटाटा
- लसूण
- हिरवी मिरची
- कोथिंबीर
- चिली फ्लेक्स
- काळी मिरी पावडर
- चाट मसाला
- गरम मसाला
- मीठ
- दही किंवा लिंबाचा रस
- गरम तेल
- बारीक चिरलेला कांदा
- तेल
हेही वाचा : Video : तुम्ही कधी झणझणीत दही पिठलं खाल्ले आहे का? नसेल तर एकदा नक्की खाऊन पाहा, ही घ्या सोपी रेसिपी
कृती
- सुरुवातीला एका भांड्यामध्ये तांदळाचे पीठ घ्या.
- त्यानंतर बटाटे घ्या आणि बटाट्याची साल काढून घ्या.
- त्यानंतर बटाटा चिरून घ्या.
- त्यानंतर चिरलेला बटाटा एका भांड्यात ठेवा आणि त्यात पाणी टाका. दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने हा बटाटा धुवून घ्या.
- धुतलेला बटाटा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करावा. त्यात आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाका.
- बटाट्याची पेस्ट तयार होईल. यात पाण्याचा अजिबार वापर करू नये.
- मिक्सरमधून तयार केलेली बटाट्याची पेस्ट तांदळाच्या पिठामध्ये टाका.
- त्यानंतर त्यात चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर आणि चाट मसाला टाका.
- त्यानंतर त्यात गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाका.
- हे मिश्रण एकत्र करा. त्यानंतर यामध्ये दही टाका.
- जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस वापरू शकता.
- त्यानंतर यामध्ये यात थोडं थोडं पाणी टाका. घट्ट मिश्रण तयार करा.
- गॅसवर तेल गरम करा.
- तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे आणि बारीक चिरलेला कांदा टाकावा आणि चांगला परतून घ्या. त्यानंतर त्यात आपण तयार केलेले मिश्रण यात टाका.
- मध्यम आचेवर हे मिश्रण एकत्र करा. घट्ट गोळा तयार होईपर्यंत हे मिश्रण परतून घ्या.
- त्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्या.
- त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू या आणि मिश्रणामध्य एकत्रित करा.
- त्यानंतर या मिश्रणाचे छोटे गोळे करुन तुमच्या आवडीनुसार कटलेट, वडे, किंवा कोणताही आकार द्या.
- त्यानंतर एका कढईत तेल गरम करून तुम्ही आकार दिलेला पदार्थ मध्यम आचेवर तळून घ्या.
- हा पदार्थ तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर खाऊ शकता.