ब्रोकोली सेलेरी सूप
साहित्य
आणखी वाचा
* अर्धा किलो ब्रोकोली
* सेलेरीच्या ४-५ काडय़ा
* १ मोठा कांदा
* ३० ग्रॅम बटर
* २ चमचे मीठ
* १ चमचा काळी मिरी, पाऊण कप पाणी
कृती
* ब्रोकोली आणि सेलेरी धुऊन चिरून घ्या.
* पातेल्यात पाणी उकळून त्यात ब्रोकोली आणि सेलेरी उकळून घ्या. यातच मीठ आणि काळी मिरीही उकळा.
* एका पसरट पातेल्यामध्ये बटर वितळवून घ्या. कांदा बारीक चिरा आणि ३-४ मिनिटे या बटरमध्ये परता.
* आता बटरवर ब्रोकोली आणि सेलेरीचे मिश्रण ओता. नीट मिसळून शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमधून ते वाटून घ्या.
* पुन्हा एकदा पातेल्यात घालून गरम करून प्या किंवा थंडच सव्र्ह करा.