गाजर ही एक हंगामी भाजी आहे ज्यात व्हिटॅमिन-ए, कॅल्शियम, फायबर, अँटिऑक्सिडेंट, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम आणि लोह यासारख्या गुणधर्मांचा साठा आहे. त्यामुळे गाजराच्या साहाय्याने लोक हिवाळ्यात लोणचे, पुडिंग, ज्यूस किंवा स्मूदी बनवून त्याचे सेवन करतात. पण तुम्ही कधी गाजर कांजी ट्राय केली आहे का? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी गाजर कांजी बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. गाजर कांजीचे नियमित सेवन केल्याने आपले डोळे निरोगी राहतात. इतकंच नाही तर गाजर कांजी प्यायल्याने तुमची पचनशक्ती आणि रक्तदाबही चांगला राहतो, तर चला जाणून घेऊया गाजर कांजी कशी बनवावी
गाजर कांजी साहित्य –
काळे गाजर – २ ते ३
बीटरूट – १ लहान
मोहरी – १ टेस्पून
मीठ – १ टेस्पून
लाल तिखट – १ टीस्पून
हिंग – १ चिमूटभर
पाणी – अडीच लिटर
गाजर कांजी कृती
गाजर आणि बीटरूट धुवून, सोलून घ्या आणि त्यांचे लांब तुकडे करा
आता अडीच लिटर पाणी उकळून थंड करा.
गाजर आणि बीटरूट एका काचेच्या बरणीत ठेवा आणि त्यात मोहरी, मीठ, हिंग आणि लाल तिखट घाला आणि चांगले मिसळा.
आता उकळलेले आणि थंड केलेले पाणी टाकून बरणी किमान ४ दिवस उन्हात ठेवा.
बरणी दररोज थोडीशी हलवा जेणेकरून सर्व साहित्य चांगले मिसळले जातील.
हेही वाचा >> रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
दुपारच्या जेवणात किंवा न्याहारीसोबत सर्व्ह करा, पचन व्यवस्थित होण्यास मदत होईल. आपण ते सुमारे २ महिने साठवू शकता.