Carrot milk recipe: गाजरात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. गाजराचे फायदे भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. गाजरांमध्ये विशिष्ट प्रकारचे जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे डोळे, यकृत, किडनी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आतापर्यंत तुम्ही गाजराचे अने पदार्थ खाल्ले असतील आज आम्ही तुम्हाला गाजर दुधाची रेसिपी सांगणार आहोत.गाजर दूध तयार करण्यासाठी शिजवलेली गाजराची प्युरी लागते. ही प्युरी दुधात घालून त्यात वेलची आणि दालचिनी घातल्याने त्याची चव वाढते. चिरलेले बदाम आणि केशरने सजवून सर्व्ह करू शकता. ही एक हटके आणि मुलांना आवडेल अशी डिश आहे. चला तर पाहुयात याची सोपी रेसिपी

गाजर दूध साहित्य

winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
Carrot is beneficial for body how to make gajar ki kanji recipe in marathi
हिवाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! पिढ्यानपिढ्या बनवली जाणारी खास रेसिपी
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी

२ गाजर (सोललेली)
२ वाट्या दूध
दालचिनी
वेलची आणि साखर चवीनुसार
४-५ बदाम, उकडून व चिरुन घ्या
केशराचे तुकडे

गाजर दूध कृती

१. गाजर सोलून आणि कापून घ्या आणि प्रेशर कुकरमध्ये थोडे मऊ होईपर्यंत शिजवा.

२. शिजवलेले गाजर आणि चिरलेले बदाम ब्लेंडरमध्ये थोडेसे पाणी घालून त्याची प्युरी तयार करा.

३. आता एका पॅनमध्ये दूध गरम करा, त्यात लवंगा घाला. आता त्यात दालचिनी घालून उकळा.

४. यानंतर उष्णता कमी करा आणि सुमारे ५ मिनिटे उकळू द्या.

हेही वाचा >> २ गाजराचे चटकदार लोणचे; ‘या’ लोणच्यासोबत दोन घास जास्तच खाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी

५. आता यात गाजर प्युरी घाला आणि ते मिक्स करा. ३-४ मिनिटे ढवळून घ्या. आता या मिश्रणात केशर आणि साखर घालून नीट मिसळून घ्या.

६. तयार मिश्रण एका ग्लासमध्ये घाला. चिरलेले बदाम आणि केशरने सजवा आणि सर्व्ह करा.