Carrot Smoothie Recipe आता उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. यामुळे आता वेगवेगळे ज्सून आणि स्मुदी याची मागणी वाढली आहे. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी कशी प्रकारे हेल्दी स्मुदी तयार करायची हे सांगणार आहोत. स्मुदीमध्ये फळे आणि भाज्या असतात ज्या सर्व महत्वाच्या पोषक घटकांनी परिपूर्ण असतात. उन्हाळ्याच्या हंगामात, बर्‍याच लोकांना सनबर्नची समस्या उद्भवते, ही स्मुदी त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे शरीराच्या विषाक्त पदार्थांना बाहेर टाकण्याचे काम करतात. चला तर मग पाहूयात घरच्या घरी कशाप्रकारे हेल्दी स्मुदी तयार करायची.

कॅरट स्मुदी साहित्य

२ ते तीन गाजर मध्यम आकाराचे
१/२ लिंबू
१/२ इंच आले
मध आवश्यक असल्यास

कॅरट स्मुदी कृती

१. सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुऊन त्याचे वरील मुळांचे धागे काढून घ्यावेत. त्यांचे काप करून मिक्सरच्या भांड्यात घालून घ्या सोबत आले बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.

२. त्यानंतर ग्लास भरून पाणी थोडे थोडे करून ओतावे आणि फिरवत रहावे. गाजर पूर्णपणे बारीक पेस्ट झाले पाहिजे त्यानंतर गाजर ग्लासमध्ये काढून त्यात लिंबू पिळावे.

हेही वाचा >> “रताळ्याचं श्रीखंड” खाताना कळणार नाही की यात रताळे आहे, नोट करा टेस्टी रेसिपी

३. आता लिंबू पिळल्यानंतर थोडासा आंबटपणा त्याला येतो. म्हणून आवडत असल्यास मग त्यामध्ये घालावा किंवा मध न घालता ही हीच स्मुदी तुम्ही तशीच पिऊ शकता. अशाप्रकारे तयार आहे वेट लॉस ड्रिंक गाजराची स्मूदी..