Cauliflower Popcorn Recipe: फ्लॉवर म्हणजेच फुलकोबी खायला आपल्यातील बऱ्याच जणांना आवडते. फुलकोबी दिसायला जेवढी चांगली दिसते तेवढेच या भाजीचे शरीराला फायदेही आहेत. या भाजीमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात ; जे आपल्या आरोग्यसाठी फार फायदेशीर असतात. या भाजीपासून वेगवेगळे पदार्थही बनवले जातात. तर नेहमीच भाजी बनवण्यापेक्षा काही तरी वेगळा पदार्थ बनवता आला तर…म्हणूनच आज आपण फ्लॉवर म्हणजेच फुलकोबीपासून पॉपकॉर्न बनवणार आहोत. चला तर पाहूयात या पदार्थाची सोपी रेसिपी.

साहित्य :

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
prasad lad Ambadas Danve
“भाजपात जुम्मा-जुम्मा चार दिवस झालेला माणूस मला…”, सभागृहातील राड्यानंतर अंबादास दानवेंचा प्रसाद लाडांवर हल्लाबोल
21st June Panchang & Rashi Bhavishya
वटपौर्णिमा विशेष, २१ जून पंचांग: आज मेष ते मीन पैकी कुणाला लाभणार सौभाग्य; तुमच्या नशिबात कोणत्या रूपात येईल सुख?
30th June Mararthi Panchang & Rashi Bhavishya
३० जून पंचांग: शनी महाराज झाले वक्री, आजचा सर्वार्थ सिद्धी योग मेष ते मीन राशींच्या नशिबाला कशी देईल कलाटणी?
26th June Panchang & Rashi Bhavishya
२६ जून पंचांग: प्रीती योगामुळे आजचा दिवस शुभ, पण मेष ते मीन सर्वच राशींना राहावे लागेल ‘या’ गोष्टींपासून सावध, वाचा तुमचं भविष्य
Spicy Mushroom bhaji recipe
घरच्या घरी बनवा चटकदार मशरूमची भाजी; नोट करा साहित्य आणि कृती
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान

१. फुलकोबी
२. दूध
३. अंडी
४. मैदा
५. मक्याचं पीठ
६. लसूण पावडर
७. मिरी पावडर
८. जिरे पावडर
९. हळद पावडर
१०. मिरची पावडर
११. धने पावडर
१२. मीठ
१३. तेल

हेही वाचा…Kothimbir Vadi Recipe: बाहेरून कुरकुरीत अन् आतून मऊ ‘कोथिंबीर वडी’; VIDEO तून पाहा अनोखी पद्धत; रेसिपी लिहून घ्या पटकन

कृती :

१. गॅस चालू करा त्यावर पाण्याचे भरलेला टोप ठेवा.
२. त्यात मीठ, हळद व फ्लॉवरचे तुकडे घाला.
३. नंतर दुसरीकडे मिरची पावडर, लसूण पावडर, मीठ आणि फोडून घेतलेली अंडी मिक्स करा.
४. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
५. नंतर एका ताटात मैदा, मक्याचे पीठ घ्या आणि त्यात मिरची, मिरपूड, धणे यांची पावडर घाला.
६. मिश्रण एकजीव करून घ्या.
७. अंड्याच्या तयार करून घेतलेल्या मिश्रणात फ्लॉवरचे तुकडे घाला.
८. नंतर एक एक तुकडे तयार केलेल्या मैद्याच्या मिश्रणात बुडवून घ्या.
९. मैद्याच्या मिश्रणात चमचाभर अंड्याचे मिश्रण घाला.
१०. नंतर पुन्हा अंड्याच्या मिश्रणात फ्लॉवरचे तुकडे बुडवा आणि पुन्हा त्याला पीठ लावून घ्या आणि खरपूस तळून घ्या.
११. अशाप्रकारे तुमचे फ्लॉवरचे पॉपकॉर्न’ तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @minimalicious.food व ही रेसिपी या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या घरी फुलकोबीची भाजी शिजवली जाते. खाण्याचे प्रमाण कमी-अधिक असेल, भाज्यात बदल म्हणून ही भाजी खाल्लीच जाते. ती आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हितकारक असून व्हिटॅमिन बी व सीचे प्रमाण अधिक आहे. वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह झालेल्यांसाठी ही भाजी हितकारक आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून पाहा आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला द्या.