Veg Recipe: जर तुम्हाला रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर जेवणाच्या मेनूमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. नेहमीची तीच ती भाजी खाण्याऐवजी बनवा झटपट चकलीची करी. एरवी आपण दिवाळीशिवाय चकली खात नाही. मात्र तुम्ही आता याच चकलीची भाजी बनवू शकता.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
झटपट चकलीची करी / भाजी साहित्य
- २ कांदे मोठे उभे कापून
- १/४ कप खोबरं किस
- ६ ते ७ लसुण पाकळ्या
- १ इंच आले
- १ टीस्पून जीरे
- खडे मसाले – (लवंग, मिरे, वेलची, दालचिनी, तमालपत्र)
- २ टेबलस्पून धणे
- २+४ टेबलस्पून तेल
- २ काश्मिरी लाल मिरची
- २ हिरव्या मिरच्या
- १/४ kp कोथिंबीर देठ
- २ टेबलस्पून लाल तिखट
- १ टेबलस्पून गरम मसाला
- चवीनुसार मीठ
- पाणी आवश्यक ते नुसार
- १ टेबलस्पून कोथिंबीर
- चकल्या उरलेल्या
झटपट चकलीची करी / भाजी कृती –
स्टेप १
वरील सगळे मसाल्याचे जिन्नस २ टेबलस्पून तेल घालून छान खमंग भाजून घ्या. नंतर गार करून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
स्टेप २
नंतर कढईत तेल घालून मसाला छान भाजून घ्या, त्यात आवश्यक ते नुसार पाणी घालून उकळी येऊ द्यावी. नंतर त्यात चकली चे तुकडे करून घाला व छान उकळी येऊ द्यावी. नंतर कोथिंबीर घाला.
हेही वाचा >> नव्या पद्धतीनं करा सोयाबीनची चमचमीत भाजी; ‘असा’ करा मसाला, बोट चाटत रहाल अशी चमचमीत भाजी
स्टेप ३
गरम गरम सर्व्ह करा.
First published on: 06-03-2024 at 15:31 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaklichi curry recipe in marathi bhaji recipe in marathi tiffin bhaji recipe srk