Chana Chat Recipe: अनेकदा संध्याकाळच्या नाश्त्याला चटपटीत, झणझणीत काहीतरी खावसं वाटतं. म्हणून आनेकजण शेवपुरी, पाणीपुरी, भेळ असे चमचमीत पदार्थ बाहेर जाऊन खातात किंवा घरीच बनवतात. यात ‘चना चाट’ हा पदार्थही अनेकांना खूप आवडतो. मसालेदार चमचमीत असा चना चाट आता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता. यानिमित्ताने आज आपण ‘चना चाट’ची रेसिपी जाणून घेणार आहोत.

हेही वाचा… उरलेला भात फेकून देताय? मग थांबा! झटपट करा ‘हा’ कुरकुरीत पदार्थ, लगेच लिहून घ्या रेसिपी

साहित्य

२५० ग्रॅम चणा
२ चिरलेले टोमॅटो
२ चिरलेले कांदे
२ चिरलेली हिरवी मिरची
१ चिरलेली काकडी
१/२ वाटी चिरलेली कोथिंबीर
१ लिंबाचा रस
३-४ टिस्पून हिरवी चटणी
१ टिस्पून मीठ
१/२ टिस्पून काळे मीठ
१ टिस्पून चाट मसाला
१ टिस्पून भाजलेला जिरे पावडर
१/४ टिस्पून तिखट पावडर
१/४ टिस्पून गरम मसाला
१/४ टिस्पून धणे पावडर

हेही वाचा… बटाट्याची नवीन रेसिपी ट्राय करायचीय? मग ‘पोटॅटो लिफाफा’ एकदा करून पाहाच, लगेच लिहून घ्या रेसिपी

हेही वाचा… घरच्याघरी लहान मुलांसाठी केक बनवायचाय? मग ‘ओरिओ मिनी केक’ची रेसिपी एकदा ट्राय कराच

कृती

सर्वप्रथम, चणे चांगल्याप्रकारे धुवा आणि रात्रभर भिजवून ठेवा. नंतर एका प्रेशर कुकरमध्ये चणे टाका.

नंतर त्यात पाणी आणि मीठ घाला. कमी आचेवर १०-१५ मिनिटं प्रेशर कुकर मध्ये शिजवा. शिजल्यावर गॅस बंद करा आणि पाणी गाळून टाका.

एक मोठं भांडे घ्या, त्यात चणे आणि सर्व साहित्य एकामागोमाग घाला. सर्व मिश्रण चांगलं मिसळा.

चणा चाट तयार आहे. ती प्लेटमध्ये सर्व करा. तिखट चणा चाटचा आनंद घ्या!

Story img Loader