chana Dal Vada Recipe : सध्या पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्षात पितरांची पुजा केली जाते. त्यांना नैवद्य दाखवला जातो. पितरांच्या नैवद्य थाळीमध्ये अनेक पदार्थ बनवले जातात. चणा डाळीच्या वड्यांना सुद्धा या थाळीमध्ये विशेष महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला चणा डाळीचे वडे कसे बनवायचे, हे सांगणार आहोत. त्यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • चणा डाळ
  • लसूण
  • हिरव्या मिरच्या
  • बारीक चिरलेला कांदा
  • जिरे
  • हिंग
  • हिंग
  • हळद
  • लाल तिखट
  • धनेपुड
  • बारीक चिरलेला कडीपत्ता
  • कोथिंबीर
  • तेल
  • मीठ

हेही वाचा : पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी कढी करताय? अशी बनवा चटपटीत कढी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती

  • चणा डाळ स्वच्छ पाण्यात चार ते पाच तास भिजवून घ्या
  • त्यानंतर त्यातील पाणी काढून या डाळीमध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घाला.
  • हे मिश्रण मिक्सरमधून जाडसर बारीक करावे.
  • बारीक केलेल्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला कांदा, जिरे, हिंग, हळद लाल तिखट, धनेपुड, बारीक चिरलेला कडीपत्ता, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकावे.
  • हे मिश्रण चांगले एकजीव करावे.
  • या मिश्रणाचे वडे हातावर थापावे.
  • त्यानंतर गरम तेलातून मंद आचेवर हे वडे तळून घ्यावे