How To Make Chana Koliwada : हॉटेल, रेस्टोरंट किंवा अगदी ढाब्यात गेलो तर सुरवातीला आपण सगळेच स्टार्टर खायला मागतवतो. यामध्ये टाईपमास, क्रिस्पी, लॉलीपॉप, सूप तर काहीवेळा ‘चना कोळीवाडा’ सुद्धा मागवला जातो. पण, काही जणांना वाटतं हा पदार्थ बनवणे खूपच कठीण असते. तर चवीला चटपटीत असा हा ‘चना कोळीवाडा’ (Chana Koliwada) बनवायला खूपचं सोपा आहे. तर आज आपण याच पदार्थाची अगदी काही मिनिटांत होणारी रेसिपी पाहणार आहोत. चला तर लगेच लिहून घ्या साहित्य व कृती…

साहित्य :

१. काबुली चणे
२. मोहरीचे तेल
३. हळद
४. धणे पावडर
५. लाल तिखट मसाला
६. जिरे पावडर
७. आलं-लसूण पेस्ट
८. पाणी
९. मीठ
१०. कॉर्न फ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ
११. बेसन
१२. लसूण

kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
Moringa or drumstick
Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
what is the reason that Sea fish became expensive
मासे परवडत नाहीत, मत्स्याहारींनी करायचे तरी काय?

हेही वाचा…Green Moong : पौष्टिक अन् चटपटीत खावंसं वाटतंय? मग हिरव्या मुगाचे बनवा रस्सेदार बिरडे; रेसिपी पटकन लिहून घ्या

व्हिडीओ नक्की बघा…

कृती :

१. काबुली चणे स्वछ धुवून रात्रभर पाण्यात भिजवण्यासाठी ठेवा.
२. सकाळी उठल्यानंतर कुकरमध्ये काबुली चणे ठेवा, त्यात मीठ, पाणी घाला आणि दोन शिट्या द्या.
३. त्यानंतर काबुली चणे पाण्यातून गाळून घ्या.
४. नंतर एका भांड्यात मोहरीचे तेल, हळद, धणे पावडर, लाल तिखट मसाला, जिरे पावडर, मीठ, पाणी आणि आलं-लसूण पेस्ट घालून पेस्ट बनवून घ्या.
५. त्यानंतर या मिश्रणात काबुली चणे मिक्स करून घ्या. नंतर त्यात कॉर्न फ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ, बेसन सुद्धा घाला.
६. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
७. त्यानंतर तेलात लसूण व काबुली चणे कुरकुरीत तळून घ्या.
८. अशाप्रकारे तुमचा ‘चना कोळीवाडा’ (Chana Koliwada) तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @pawar_omkar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काबुली चणा जितका पौष्टिक आहे तितकाच तो खायलाही स्वादिष्ट आहे. त्यात प्रथिने, व्हिटॅमिन बी ६ चांगल्या प्रमाणात असतात. तसेच फोलेट, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. त्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबर देखील असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तर तुम्ही देखील हा पदार्थ नक्की घरी बनवून बघा…