Cheese Potato Recipe: संध्याकाळी कडकडून भूक लागली की काय बनवावं हे काहीच सुचत नाही. अशा वेळी तुम्ही झटपट होणारे चीज पोटॅटो नक्कीच ट्राय करू शकता. ही रेसिपी खायला जितकी चविष्ट, तितकीच ती सोपीदेखील आहे.
चीज पोटॅटो बनविण्यासाठी लागणारे साहित्य :
- ५ उकडलेले बटाटे
- २ कप चीज (किसलेला)
- २ चमचे मैदा
- २ चमचे कॉर्नफ्लोअर
- १ चमचा मिरपूड
- १ चमचा जिरेपूड
- दीड चमचा लाल तिखट
- १ वाटी कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
चीज पोटॅटो बनविण्याची कृती :
- सर्वप्रथम एका भांड्यामध्ये उकडलेल्या बटाट्यांचे लहान काप करून, त्यात मिरपूड, जिरेपूड, लाल तिखट, कोथिंबीर, मीठ घालून हे मिश्रण एकत्र करा.
- आता या मिश्रणात थोडेसे पाणी घालून मिक्स करा. हे मिश्रण थोडे घट्ट करा.
- आता या मिश्रणाचे गोळे करून, प्रत्येक गोळ्यामध्ये किसलेले चीज टाकून घ्या.
- त्यानंतर कॉर्नफ्लोअरमध्ये थोडे पाणी घालून, एकजीव करा आणि या मिश्रणात बटाट्याचे तयार गोळे बुडवा.
- त्यानंतर हे गोळे ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्या.
- चीज टाकून तयार केलेले मिश्रणाचे गोळे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- त्यानंतर सर्व चीज पोटॅटो तळून झाल्यानंतर हे गरमागरम चीज पोटॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.